26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeChiplunपर्यटनाला चालना देण्यासाठी एकत्र या - शेखर निकम

पर्यटनाला चालना देण्यासाठी एकत्र या – शेखर निकम

पर्यटनवाढीसाठी जलपर्यटन, जंगल पर्यटन करणे शक्य आहे.

संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर, टिकलेश्वर, प्नचितगड, महिपतगड, भवानगडसारखे ऐतिहासिक महत्त्व असलेली ठिकाणे “आहेत. या पर्यटनस्थळांचा विकास करून पर्यटनाला चालना देण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. सर्वांनी एकत्रित येऊन पर्यटनाचा आराखडा करून शासनाला सादर करावा. पर्यटनस्थळांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, असे आमदार शेखर निकम यांनी देवरूख येथे सांगितले. देवरूख पंचायत समितीमधील सभागृहात पर्यटन व नैसर्गिक शेतीविकास आराखडासंदर्भात चर्चासत्र घेण्यात आले. या वेळी आमदार शेखर निकम बोलत होते. तालुक्यातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. रत्नसिंधूच्या माध्यमातून हाऊसबोट मंजूर करण्यात येईल. सप्तलिंगी नदीवर जलसंधारण अंतर्गत बंधारे बांधण्यासाठी प्रयत्न केले जातील. सप्तलिंगी नदीच्या उगमापासून शेवटपर्यंत अठरा गावे येतात. या ठिकाणी पर्यटनवाढीसाठी जलपर्यटन, जंगल पर्यटन करणे शक्य आहे.

याबाबत चर्चा करण्यासाठी सप्तलिंग परिषद घेणे आवश्यक असल्याने निखिल कोळवणकर यांनी सांगितले. पर्यटनात वाढ होण्यासाठी साहसी क्रीडाप्रकार सुरू करावे. भवानगड, राजवाडी येथील गडावर ट्रेकिंगची सुविधा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. पठारवाडी येथील जागेवर जैवविविधता उद्यान सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आमदार निकम यांनी सांगितले. चर्चासत्राला उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, प्रांत जीवन देसाई, परिविक्षाधीन अधिकारी विश्वजित गाताडे, तहसीलदार अमृता साबळे आदी उपस्थित होते.

चांगल्या दर्जाची कलमे द्या – कृषी विभागामार्फत दिली जाणारी कलमे ही निकृष्ट दर्जाची असतात. त्यामुळे ही कलमे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याला प्रतिकलम ६० रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे चांगल्या पद्धतीची कलमे शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तांबे यांनी या वेळी केली.

RELATED ARTICLES

Most Popular