28.8 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची...

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला...

उध्दव ठाकरेंचे मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत…

गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे...
HomeRatnagiriरत्नागिरीत शिक्षकाचे वासनाकांड, नको नको ते थेर केले!

रत्नागिरीत शिक्षकाचे वासनाकांड, नको नको ते थेर केले!

शिक्षकाचे नाव प्रथमेश चंद्रकांत नवेले असल्याचे संस्था चालकांनी सांगितले.

रत्नागिरीत भर मध्यवस्तीत असलेल्या गोदुताई जांभेकर विद्यालय (पहिला विद्यालय) येथील एका शिक्षकाचे ‘वासनाकांड’ उघड होताच रत्नागिरीतील सुजाण नागरिक विलक्षण संतापले. महिला विद्यालयाती पहिला विद्याथीनी त्या शिक्षकाचे सारे धेर सांगितले. तो शिक्षक जणू ‘सोकावलेला बोका’ असावा असे वाटण्याजोगे वाटण्याजोगे त्याचे एकक पाठीवर, मांडीवर व पोटावर हात फिरवे.. त्यांना तो मोबाईलवर घाणेरडे, बीभत्स मेसेज पाठवी, दुसऱ्या दिवशी व्यापलीचे मोबाईल जप्त करुन व पालकांनी त्यातून मेसेज डिलीट करे.. आणि एका मुलीला तर मिठी मारण्यापर्यंत त्या नरपुंगवाची मजल गेली होती. हे सर्व बराच काळ सुरु होते. अखेर थेर होते. भर वर्गात तो मुलींच्या आज बिंग फुटले आणि सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या रत्नागिरीतील मध्यवस्तीत असलेल्या या शंभरी पूर्ण केलेल्या शाळेत काय भयावह घडते आहे याची जाणीव सर्वांना झाली.. जे घडले ते भयानक असेच होते. अशी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे, त्या नराधमाला ‘बदलापुर’ प्रमाणेच फाशी व्हायला हवी, त्याचा बदलापूर प्रमाणेच ‘एन्काऊंटर’ व्हायला हवा अशी मागणी आता रत्नागिरीतील संतप्त नागरिक करु लागले आहेत. त्याचबरोबर त्याला कुणी पाठीशी घालत असतील तर त्यांना देखील न्यायासनासमोर खेचण्यात यावे अशीही मागणी आता संतप्त जनतेतून खुलेआम होऊ लागली आहे. रत्नागिरीत मध्यवस्तीत बसस्टँड समोर असलेल्या गोदुताई जांभेकर विद्यालयात हा जो काही प्रकार घडला त्यामुळे सारी रत्नागिरी सुन्न झाली.

महिला विद्यालय येथील घटना – रत्नागिरी शहरात मध्यवस्तीत बस स्टँडसमोर असणाऱ्या गोदुताई जांभेकर विद्यालयात म्हणजेच महिला विद्यालय’मध्ये आज ही घडला घडल्याचे निदर्शनास आले. तो शिक्षक शेती व पशुपालन विषयाचे म्हणे धडे देत असे.. परंतु पशु पालनाचे धडे देता देता बहुदा तो ‘पशू’प्रमाणेच वागू लागला असेच म्हणावे लागेल. दिवसाढवळ्या भर वर्गात तो मुलींशी अत्यंत असभ्य वर्तन करीत असे. वर्ग सुरु असताना मुलींच्या पाठीवरे, मांडीवर व पोटावर तो हाताने ‘चोळीत’ असे.. एका मुलीला भर वर्गात त्याने मिठी मारल्याचाही प्रकार घडल्याचे सांगण्यात येते. परंतु सर्वच मुली त्याचे ‘कारनामे’ सांगण्यासाठी धजावत नाहीत, त्या घाबरतात.

घाणेरडे मेसेज पाठवी – हा ‘सोकावलेला बोका’ एवढ्यावरच थांबलेला नाही तर तो मुलींना मोबाईलवर घाणेरडे व बीभत्स मेसेज पाठवी. ‘तू सुंदर आहेस’, ‘तू मला आवडतेस’, ‘शाळा सुटल्यावर बाहेर भेटूया’, ‘बाहेर गप्पा मारु व …’ अशा आशयाचे मेसेज मुलींना तो पाठवत असे. हे बराच काळ चालू. होतेः सुमारे वर्षभर सुरु असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आता या मुली सर्व सांगू लागल्या आहेत. त्यामुळे त्याची ही ‘कर्तबगारी’ आज जगजाहीर झाली आणि सुसंस्कृत रत्नागिरीला जणू त्याने काळीमा फासला अशी भावना संतप्त नागरिकांनी व्यक्त केली.

तो पक्का निर्वावलेला! – तो पक्का निर्वावलेला असावा.. मुलींना मोबाईलवर घाणेरडे मेसेज पाठवायचा आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे मोबाईल काढून घ्यायचा व म्हणे जप्त करायचा. त्यानंतर त्यातील मेसेज तो’ “डिलीट’ करुन टाकायचा, असा प्रकार सुमारे वर्षभरापासून सुरु असल्याचे अनेक मुली, त्यांचे पालक व नागरिक सांगत आहेत. गरीब परिस्थितीतून आलेल्या मुलींनी सुमारे वर्षभर हा भयावह जाच सोसला याबद्दल अनेक नागरिकांनी तीव्र चीड व्यक्त केली. हे इतका प्रदीर्घ काळ कसे काय चालू शकते? याला कुणाचा पाठींबा आहे? संस्थावाले डोळे झाकून बसले होते का? असे प्रश्न आता जनतेत विचारले जावू लागले आहेत.

अनेक मुली शिकार झाल्या? – तो शिक्षक दहावीच्या वर्गात शिकवायचा. तो मागील काही दिवसांपासून हे थेर करीत असे. अनेक मुलींची याबाबत तक्रार होती. परंतु मुली घाबरत असत आणि त्याचा तो गैरफायदा घेत असे. दरम्यान एक मुलगी काहीशी नव्र्व्हस वाटल्याने त्या मुलीच्या आईने तिला खोदून खोदून विचारले तेव्हा हे सर्व बाहेर पडले. पालकांनी एकमेकांना फोन करुन याबाबत माहिती घेतली तेव्हा अनेक मुलींच्या बाबतीत हे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले.

संतप्त पालक सरसावले – त्यानंतर चिडलेल्या पालकांनी शाळेत येवून आज जाब विचारला. जवळपास ९ पीडित मुलींचे पालक आले होते. त्यांनी शाळेतील संबंधित मंडळींकडे चौकशी सुरु केली तेव्हा तो शिक्षक शाळेच्या एका खोलीत लपला होता. त्याला बाहेर आणा अशी संतप्त पालकांची मागणी होती. हे सर्व मध्यवस्तीत बसस्टँडसमोर असलेल्या महिला विद्यालय शाळेत घडत होते. आवाज ऐकून रस्त्यावरुन जाणारे स्टैंड परिसरातील अनेक नागरिक शाळेत धावून आले आणि मोठा जमाव जमा झाला.

शिपायाचा आगावूपणा! – एकूण प्रकार समजताच नागरिक संतप्त झाले होते. तो पालकांना दाद देत नव्हता तेव्हा नागरिकांनी त्याला खोलीतून बाहेर आणून शाळेसमोरील पटांगणात आणले आणि संतप्त जमावाने त्याला यथेच्छ रेटवले, धोपटले व धू धु धुतले. काहींनी तर त्याला चप्पलने बडवले. त्याचवेळी शाळेतील एक शिपाई पुढे आला आणि त्याने एका नागरिकाला लाथ मारली. त्यामुळे प्रकरण आणखीन चिघळले. संतापलेल्या नागरिकांनी त्या शिपायाला देखील यथेच्छस बदडले.

संस्था चालकांना फोन – महिला विद्यालयात हा सारा ‘राडा’ सुरु असताना संस्थेच्या काही मंडळींनी संस्था चालकांना फोनवर सारा प्रकार सांगितला. तेव्हा संस्था चालकांनी ‘त्या सर्वांना घेऊन वर (म्हणजे कॉलेजवर) या’ असे म्हणे सांगितले. त्यामुळे नागरिक अधिक संतापले. त्यांनी सांगितले, ‘आम्ही काय म्हणून यायचे? तुमची संस्था, तुम्ही या’. अखेर संस्था चालक महिला विद्यालयात येवून दाखल झाले. संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, उप कार्याध्यक्ष विजय साखळकर, सचिव श्री. सतीश शेवडे, श्री. राजन मलुष्टे, श्री. मनोज पाटणकर आदी संस्थेचे पदाधिकारी महिला विद्यालयात आले.

निलंबनाची कारवाई – त्यांच्या समोर संतप्त पालकांनी व नागरिकांनी त्या शिक्षकाला जाब विचारला. जमाव संतापला होता. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एकूण माहिती जाणून घेतली आणि उपस्थित सर्व पालकांना, नागरिकांना व पत्रकारांना त्यांनी सांगितले की “त्या शिक्षकाला आम्ही आजच्या आज निलंबित केले आहे, उद्यापासून तो शिक्षक शाळेत दिसणार नाही” असे त्यांनी सांगितले. तो शिक्षक कंत्राटी पध्दतीवर कामाला होता असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पोलिस धावून आले – भर दिवसा शाळेत ही हाणामारी सुरु झाल्यानंतर घडला प्रकार पोलिस अधिक्षकांना कळवण्यात आला. पोलिस अधिक्षकांनी तात्काळ पोलिस कुमक पाठवली. पोलिस शाळेत दाखल झाल्यावर नागरिकांनी गर्दी अधिकच वाढली. पोलिसांनी सर्व माहिती घेतली व नंतर त्या शिक्षकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्या शिक्षकाला तसेच ५ पीडीत मुलींना व त्यांच्या पालकांना पोलिस स्टेशनवर नेले.

पोलिस स्थानकात गुन्हा – याप्रकरणी एका पीडीत मुलीची तक्रार पोलिसांनी दाखल करुन घेतली असून त्या शिक्षकाच्या विरुध्द भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७५, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम, ८, १०, १२ अन्वये गुन्हा दाखल केला असून आता पुढील तपास सुरु झाला आहे.

तो शिक्षक प्रथमेश नवेले ! – त्या शिक्षकाचे नाव प्रथमेश चंद्रकांत नवेले असल्याचे संस्था चालकांनी सांगितले. त्याला संस्थेने निलंबित केले असून पोलिसांनी त्याला तपासासाठी ताब्यात घेतले आहे. दुपारी ही घटना घडल्यानंतर रत्नागिरी शहर व परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येवू लागला.

RELATED ARTICLES

Most Popular