29.1 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...

चिपळूण रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या मार्गाची दुरवस्था

शहरातून कोकण रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याची सध्या...
HomeTechnologyगुगल असे कमावते अँडॉईड प्ले स्टोअरमधून पैसे !

गुगल असे कमावते अँडॉईड प्ले स्टोअरमधून पैसे !

२०१९ साली गुगलने स्वतःच्या अँड्रॉईड प्ले स्टोअरच्या माध्यमातून मध्ये ११.२ अब्ज डॉलर कमावले आहेत. एवढी रक्कम वाचून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. गुगल प्ले स्टोअरच्या इतिहासामध्ये गुगलने प्ले स्टोअरमधूनएवढी कमाई पहिल्यांदाच केली आहे. गुगलने अमेरिकेच्या न्यायालयामध्ये ही माहिती दिली आहे. २२ ऑक्टोबर २००८ साली गुगल प्ले लाँच करण्यात आले, ज्याचे नंतर गुगल प्ले-स्टोअर असे नामांतरण करण्यात आले.

२०२२ च्या अखेरीला गुगलला आणखी एका न्यायालयीन चौकशीला सामोरे जावे लागण्याची शकयता वर्तवली जात आहे. कारण अनेक कंपन्यांनी प्ले स्टोअरवर ऍप्स विकण्याच्या आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप ठेवला आहे. त्यामुळे आता गुगलने आपली प्ले स्टोअरची कमाई सार्वजनिक केली आहे. यामध्ये ऍपमधील खरेदी आणि जाहिरात कमाईचा समावेश देखील केला आहे.

गुगल प्ले स्टोरवर ऍप्सच्या यादीत येण्यासाठी वापरकर्त्यांना काही पैसे द्यावे लागतात. ऍप डेव्हलपर्सना प्ले स्टोअरवर ऑपरेशन किंमत म्हणून काही डॉलर द्यावे लागतात. या व्यतिरिक्त, काही ऍप्स ह्या सशुल्क असतात, त्या डाउनलोड करण्यासाठी पैसे आकारले जातात. या व्यतिरिक्त  ई -बुक्स देखील सशुल्क असतात,  जे गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड केले जातात. अनेक कंपन्या त्यांच्या ऍप्सच्या प्रमोशनसाठी पैसेही देतात,  ज्यातून गुगल नफा कमावते. आपल्याला गुगल प्ले स्टोअरवर चित्रपट पाहण्यासाठी देखील पैसे खर्च करावे लागतात. गुगलच्या टॉप १० सर्वाधिक कमाई करणाऱ्या ऍप्समध्ये टॉप ८ गेमिंग ऍप्सचा समावेश आहे. लहान मूले वेळ घालविण्यासाठी पालकांच्या मोबाईलवर पैसे भरून अनेक गेम डाऊनलोड करून खेळत असतात, काहीवेळा पालकही त्यापासून अनभिज्ञ असतात.

RELATED ARTICLES

Most Popular