26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeChiplunवर्षभरात ५४०० महिला झाल्या लखपती….

वर्षभरात ५४०० महिला झाल्या लखपती….

तालुक्यात महिला बचतगटाच्या दोन कंपन्याही स्थापन केल्या आहेत.

महिला सबलीकरणाला चालना देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येत आहेत. महिलांच्या विकासाच्या कक्षा रुंदावण्यासाठी बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षम होण्याचा मार्ग महिलांना उपलब्ध करून दिला आहे. तालुक्यात एकूण ९ प्रभागातून बचतगटांचे काम सुरू आहे. त्यासाठी ३ अधिकारी ७ कर्मचारी आणि प्रभाग समन्वयक मेहनत घेत आहेत. तालुक्यात २ हजार ७०० महिला बचतगट असून, त्यातील १४०० बचतगट विविध व्यावसायाच्या माध्यमातून प्रगती करत आहेत. उमेद अभियानांतर्गत महिलांची आर्थिक समृद्धी होण्यासाठी त्यांना लखपती बनवण्याचे नियोजन सुरू आहे. त्यानुसार तालुक्यात ८ हजार १३२ महिलांना लखपती करण्यात येणार आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत विविध व्यवसायातून ५ हजार ४०० महिला लखपती झाल्या आहेत. त्याशिवाय तालुक्यात महिला बचतगटाच्या दोन कंपन्याही स्थापन केल्या आहेत.

पेढे प्रभागात कनक हिरकणी महिला शेतकरी उत्पादक कंपनीतून गारमेंट क्लस्टर उभारण्यात येत आहे. या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून ९६५ महिला जोडल्या गेल्या आहेत. मालदोली प्रभागात मालदोली कोकण क्रांती महिला शेतकरी उत्पादक कंपनीत ६६८ महिलांचा सहभाग राहिला आहे. या गटाच्या माध्यमातून दाभोळ खाडीत हाऊसबोटचा प्रकल्प राबवण्यात येणार असून, तो अंतिम टप्प्यात आहे. महिनाभरात हा प्रकल्प मार्गी लागेल.

RELATED ARTICLES

Most Popular