26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeKokanशहरात 'वाडाकोलम'ला वाढली मागणी, तांदळाच्या दरात वाढ

शहरात ‘वाडाकोलम’ला वाढली मागणी, तांदळाच्या दरात वाढ

तुकडा तांदूळ ४५ ते ५०, तर अखंड तांदूळ ६९ ते ११० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे.

बाजारात नवीन तांदूळ विक्रीला आला असून, जुन्या तांदळापेक्षा नवीन तांदळाचे दर कमी आहेत. परंतु, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तांदळाच्या दरात १० ते १२ रुपयांची वाढ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भात उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. ग्रामीण भागात घरचा तांदूळ वापरला जात असला तरी शहरात मात्र बाजारी तांदूळ खरेदीसाठी ग्राहकांचा वाढता प्रतिसाद आहे. ‘वाडाकोलम’ची ग्राहकांना पसंती आहे. यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे भात कापणीला विलंब झाला. त्यात तयार पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादकता खालावली आहे. ग्रामीण भागात आजही घरचा तांदूळ वापरला जातो. शहरवासीयांना मात्र बारीक, सुवासिक तांदळाची भुरळ आहे. त्यामुळे वाडाकोलम, आंबेमोहर, इंद्रायणी, जिरेसाल, ऐश्वर्या कोलम हा तांदूळ खरेदी केला जातो. सर्वाधिक पसंती मात्र ‘वाडाकोलम’साठी आहे. नियमित खाण्यासाठी तुकडा तांदूळ, तर सणवार किंवा समारंभासाठी बारीक तांदूळ निवडला जातो. तांदळाच्या किमतीत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तुकडा तांदूळ ४५ ते ५०, तर अखंड तांदूळ ६९ ते ११० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. तांदूळ प्रकाराप्रमाणे दरही भिन्न आहेत.

भाव आणखी वाढणार खरीप हंगामात पावसाचे प्रमाण चांगले होते, पीक चांगले आले. परंतु, ऐन कापणीच्यावेळी पावसाने झोडपल्यामुळे पिकाची उत्पादकता खालावली. त्यामुळे तांदळाच्या दरात वाढ झाली असून अजून दर वाढणार असल्याचे विक्रेते सांगत आहेत. ‘वाडाकोलम’ तांदूळ बारीकं असल्यामुळे जिल्ह्यात ग्राहकांकडून खरेदीसाठी वाढती पसंती आहे. जुना वाडाकोलम ९० रुपये, तर नवा ६८ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. नवीन तांदूळ खरेदी करून ग्राहक साठा करून ठेवत आहेत. चार-पाच महिन्यांनंतरच हा तांदूळ खाण्यासाठी वापरला जातो. दरवाढीचा फटका लग्नसराईचे दिवस असल्याने तांदळाला वाढती मागणी आहे. मात्र, दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular