26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriमिरकरवाड्यातील मच्छीमारांचा मत्स्य विभागाच्या कार्यालयात मोठा हंगामा

मिरकरवाड्यातील मच्छीमारांचा मत्स्य विभागाच्या कार्यालयात मोठा हंगामा

मिरकरवाड्यातील अनधिकृत झोपड्या पाडण्याच्या नोटिस मत्स्यविभागाने दिल्या होत्या.

मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरी दौऱ्यात बेकायदेशीर मच्छीमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्याचे तसेच मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश खात्याला दिले होते. रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा बंदरा जवळील अनधिकृत बांधकाम बांधणाऱ्या तीनशेच्या वर मच्छीमारांना मत्स्य विभागाने नोटीसा दिल्या होत्या. शुक्रवारपासून या कारवाईला सुरुवात होणार होती. मात्र स्थानिक मच्छिम ारानी मत्स्य विभागाच्या कार्यालयात येऊन गोंधळ घातला सहाय्यक मत्स्य अधिकारी कार्यालयात संध्याकाळी तुफान खडाजंगी झाली. अखेर सोम वारपर्यंत ही कारवाई पुढे ढकलण्यात आली.

झोपड्या पाडण्याच्या नोटीसा – मिरकरवाड्यातील अनधिकृत झोपड्या पाडण्याच्या नोटिस मत्स्यविभागाने दिल्या होत्या. त्याची कार्यवाही शुक्रवारपासून सुरू होणार होती. त्यासाठी खास मुंबईहून आलेल्या सहआयुक्त महेश देवरे मत्स्यव्यवसाय (सागरी) महाराष्ट्र राज्य यांच्या देखरेखी खाली ही कारवाई होणार होती. मिरंकरवाडा रत्नागिरी येथील मिरकरवाडा मत्स्यबंदर हे महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या मालकीचे असून भूमापन क्र. ७३/०२ क्षेत्र १०.८४ हेक्टर आर ही जागा अधोस्वाक्षरीतांच्या अखत्यारीत येते. या शासकीय जागेत कोणतेही खाजगी बांधकाम करण्यास मनाई आहे. तरीही या जागेत स्टॉल / कावन / बांधकाम इ. बांधलेले आहे.

मिरकरवाडा टप्पा क्र.२ मधील उर्वरीत कामे जसे कि अंतर्गत रस्ते, वर्कशॉप, लिलावगृह, विश्रामगृह जाळी विणकाम शेड इ. कामे सुरु करण्याच्या अनुषंगाने सदर शासकीय जागेतील बांधकाम त्वरीत हटवावे म्हणून नोटिस देण्यात आल्या होत्या. या संदर्भातील सभेसाठी श्री. देवरे रत्नागिरी येथे आले असून त्यांच्या समक्ष मच्छीमारांनी गोंधळ घातला. ७ दिवसाची मुदत वाढवून देण्याची मागणी मच्छिमार करत होते. त्यांचा गोंधळ वाढल्यामुळे पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला. न्यायालयाचा निकाल मत्स्य विभागाच्या बाजूने लागल्याची प्रत आजच रत्नगिरी कार्यालयाला प्राप्त झाली. शेवटी * गोंधळावर तोडगा म्हणून सोमवार पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular