27 C
Ratnagiri
Thursday, August 7, 2025

रत्नागिरीजवळ भाट्ये येथे अपघात…

रत्नागिरी ते पावस जाणाऱ्या रस्त्यावर भाट्ये गावाकडे...

राजापूर तालुक्यामध्ये आढळली अतिदुर्मीळ ‘हंसतुरा’ प्रजाती

राजापूर तालुक्यात पावसाळ्यात उगवणारी, एक अतिदुर्मीळ आणि...

कोल्हापूरकरांसमोर ‘वनतारा’ झुकलं ! ‘महादेवी’ पुन्हा नांदणी मठात येणार

हत्तीणीला पुन्हा पाठवण्यात येणार आहे. वनताराचे सीईओ...
HomeEntertainment“शेरशहा” – भारतामध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट

“शेरशहा” – भारतामध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट

कोरोनामुळे थिएटर अद्यापही बंद असल्याने ऑनलाईन मुव्हीचा आस्वाद घेणाऱ्या लोकांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. नुकताच ओटीटीवर रिलीज झालेला शेरशाह सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर भारतातील आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट बनला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये १५ ऑगस्ट पूर्वी रिलीज झालेल्या शेरशाह या चित्रपटाने या पोर्टलवरील सर्व चित्रपटांचे सेट केलेले दमदार रेकॉर्ड मोडित काढले आहेत.

अमेझॉन प्राईम व्हिडिओवर व्हिडीओ स्ट्रीमिंग पोर्टलवर पाहण्यासाठी असंख्य चित्रपट आहेत, पण भारतामध्ये आत्ता पर्यंत सर्वात जास्त पाहिला जाणारा चित्रपट कोणता असेल तर तो ठरला आहे, “शेरशहा”.  सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांनी या सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले आहे. या चित्रपटाचे कथानक देशासाठी शहीद झालेले कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनकथेवर आधारित आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज करण्यात आला आणि २१० देशांमध्ये हा चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आला आहे. ओटीटीवर एवढी विक्रमी कामगिरी करणारा हा पहिलाच चित्रपट आहे. शेरशाह  या चित्रपटाला लोकांचे आणि समीक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा याने स्वतः ही माहिती इन्स्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे. चित्रपटात विक्रम बत्राच्या प्रेयसीची भूमिका किआरा अडवाणी हिने निभावली असून त्यांच्या चित्रपटाला आणि अभिनयाला मिळालेलं यश पाहून सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा खूपच खुश झाले आहेत.

शेरशाह  चित्रपटाला मिळत असलेला तुफानी यशाबद्दल त्याने फॅन्सचे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे व्हिडीओसोबत तुमच्याकडून मिळत असलेल्या प्रेमासाठी मी खूप खूप आभारी आहे, असे कॅप्शन लिहत त्याने फॅन्सचे आभार मानले. अभिनेश्री कियारा आडवाणीने सुद्धा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट शेअर करत #शेरशाह असा हॅशटॅग आणि तुम्ही आमच्यावर करत असलेल्या प्रेमाच्या वर्षावासाठी, आदर आणि सहकार्यासाठी खूप खूप आभार,  असे लिहत फॅन्सचे आभार मानले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular