31.5 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

संगमेश्वरातील दिवट्या कुलदीपकाने वयोवृद्ध बापाला ‘सुरा’ दाखवून खंडणी मागितली

पैशासाठी अपहरण करण्याच्या घटना घडत असतानाच रत्नागिरी...

दांडगा वशीला असलेला कोकरे महाराज पोलीस कोठडीत !

या भगवान कोकरे नावाच्या महाराजाचा लोटे व...

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...
HomeIndiaवाहनांच्या कर्कश हॉर्नला बाय बाय, आत्ता वाजणार सुमधुर हॉर्न

वाहनांच्या कर्कश हॉर्नला बाय बाय, आत्ता वाजणार सुमधुर हॉर्न

भारतामध्ये अनेक प्रकारची प्रदूषणे आपण पाहिली आहेत. जसे कि, वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, भूमी प्रदूषण इत्यादी अनेक प्रकारची प्रदूषणे आहेत. काही वाहनांचे हॉर्न एवढे कर्णकर्कश असतात कि, कानठळ्या बसवतात. काही जण बाईकला सुद्धा एवढा मोठ्या आवाजाचा हॉर्न बसवितात कि, बाजूला होण्यासाठी जेंव्हा हॉर्न वाजविला जातो तेंव्हा अक्षरशा अंगावर शहरा येतो.

मधीच कुत्र्याच्या ओरडण्याच्या आवाजाचे हॉर्न बसविण्यात येत होता. परंतु, त्यामुळे बऱ्याच दुर्घटना घडल्यामुळे अखेर पोलिसांकडून अशा हॉर्न असणाऱ्या बाईक आणि कारवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहनांचे हॉर्न कर्णकर्कश न असता कर्णमधुर असणे गरजेचे आहे. याचाच सखोल विचार करून  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनांच्या हॉर्नचा कर्कश्यपणाचा आवाज बदलून त्याऐवजी भारतीय संगीत वाद्यांच्या आवाजाचा उपयोग करावा,  असा आदेश लवकरच देण्याची शक्यता आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच सांगितले की, वाहनांच्या कर्कश हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषणही मोठ्या प्रमाणावर होते आहे. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनेही अशा कानठळ्या बसविणाऱ्या हॉर्नचा सूर बदलणे गरजेचे आहे. त्यासंदर्भातील आदेश लवकरच जारी करण्यात येईल असे सूत्रांनी माहितीमध्ये सांगितले आहे.

गाडी सिग्नलला थांबलेली असताना देखील कित्येक लोक आपल्या गाडीला मोठ्या आवाजाचे हॉर्न लावतात आणि विनाकारण सतत हॉर्न वाजवत असतात. त्यामुळे गाडी चालविणाऱ्यांना व रस्त्यावरून चालणाऱ्यां माणसांनाही त्याचा प्रचंड त्रास होतो. कोरोनाच्या काळामध्ये वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात आली होती, तेंव्हा वायू आणि ध्वनी प्रदुषणामध्ये अमुलाग्र बदल घडून आला होता.

यावरून कर्कश्य आवाजाचे हॉर्न बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घ्यायचे ठरविले ऑन, त्याऐवजी तबला, पेटी, बासरी, तानपुरा  अशा पारंपारिक वाद्यांचे सुमधुर सूर हॉर्नमधून कानावर पडल्याने कोणाच्या कानांना फार त्रास होणार नाही. आणि वाढलेले  ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण देखील कमी होण्यास मदत होईल असे केंद्राचे मत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular