26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriउबाठाचे नवे तालुकाप्रमुख शेखर घोसाळेचे साळवी स्टॉपच्या शाखेत झाले जंगी स्वागत

उबाठाचे नवे तालुकाप्रमुख शेखर घोसाळेचे साळवी स्टॉपच्या शाखेत झाले जंगी स्वागत

फटाक्यांची आतषबाजी करीत जोरदार घोषणाबाजी केली.

शिवसेना उबाठाच्या तालुकाप्रमुखपदी धडाडीचे उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे यांची निवड झाल्यानंतर बुधवारी शहरातील शिवसेना शाखा क्रमांक १ साळवी स्टॉप येथे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी उबाठाच्या कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जोरदार घोषणाबाजी केली. उबाठाचे माजी तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी राजिनामा देतं, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उबाठा तालुकाप्रमुख पद रिक्त झाले होते. याठिकाणी चार पदाधिकारी इच्छूक होते. मात्र उपजिल्हाप्रमुख म्हणून चांगली कामगिरी करणारे व शिवसेना ठाकरे गटाचे एकनिष्ठ शिलेदार शेखर घोसाळे यांच्यावर पक्षनेतृत्वाने जबाबदारी टाकली. उबाठाचे सचिव माजी खासदार विनायक राऊत यांचे विश्वासू म्हणून ओळख असणारे शेखर घोसाळे यांना त्यांच्या एकनिष्ठतेचे बक्षिस देण्यात आले आहे.

कुणालाही अंगावर घेण्याची ताकद असणारे अशी ओळख असणाऱ्या शेखर घोसाळे यांच्या निवडीमुळे मागील काही दिवसांपासून शिवसेना उबाठामध्ये आलेली मरगळ दूर झाली आहे. शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी मनापासून त्यांच्या निवडीचे स्वागत केले. निवड जाहीर झाल्यानंतर प्रथमच त्यांचे स्वागत शिवसेनेच्या साळवी स्टॉप येथील रत्नागिरी शाखेत करण्यात आले. यावेळी माजी आमदार बाळ माने, उदय बने, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवा तालुकाप्रमुख व शहर संघटक प्रसाद सावंत, उपजिल्हाप्रमुख संजू साळवी, जिल्हा समन्वयक संजय पुनस्कर, अॅड. सुजित कीर, माजी तालुकाप्रमुख राजू शिंदे, सर्व विभागप्रमुख, महिला उपजिल्हा संघटक ममता जोशी, विधानसभा क्षेत्रसंघटक सायली पवार, माजी नगरसेविका शिवलकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भगवे झेंडे लावलेल्या गाड्यांच्या मिरवणुकीने तालुकाप्रमुखांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी ढोलताशांचा गजर करण्यात आला. साळवी स्टॉप येथील ‘शाखा बांधण्यात पुढे असलेले ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष वैद्य, बाळू जाधव, प्रदीप साळवी, मिलींद सुर्वे व अन्य सहकार्यांचे मोठे योगदान असून आज ते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. स्व. राजू मजगावकर यांचेही यात योगदान असल्याचे शिवसेना उबाठाचे ज्येष्ठ पदाधिकारी उदय बने यांनी सांगत, शेखर घोसाळे यांना तालुकाप्रमुखपदासाठी शुभेच्छा दिल्या. विधानसभेनंतर काहीसे बाजूला राहिलेले उदय बने यांनी शाखेत येत शुभेच्छा दिल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले होते.

RELATED ARTICLES

Most Popular