राज्याच्या विविध भागांत जीबीएस आजाराचे रुग्ण आढळून येत असले, तरीही रत्नागिरी जिल्ह्यात एकही रुग्ण नाही. परंतु, पुणे, कोल्हापूरसह इतर ठिकाणी जीबीएसचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा या आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ‘अलर्ट मोड’वर आहे, असे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. कोरोनानंतर जीबीएस या आजाराचे रुग्ण वाढत असल्याने सर्वसामान्यांत भीतीचे वातावरण पसरत आहे. या आजारावर योग्यवेळी उपचार करून रुग्णांना बरे करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनीही आजाराची काही लक्षणे दिसताच तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.
जीबीएस आजाराचे रुग्ण पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूरसह इतर शहरांत आढळून आले आहेत. श्वास घेण्यास त्रास होत आहे. जीबीएस आजाराची लागण झाली आणि वेळेत उपचार घेतले नाही, तर श्वास घेण्यासही त्रास होतो. वेळीच उपचार घेतल्यास जीबीएस आजार हा सूक्ष्मजीव संसर्गानंतर होतो. अन्न किंवा इतर विषबाधेनंतरही होतो. वेळीच उपचार घेतल्याने रुग्ण लवकर बरा होतो. मज्जातंतूवर दुष्परिणाम जीबीएस आजारात मज्जातंतूवर अधिक दुष्परिणाम होतो. त्यामुळे वेळीच उपचार घेणे गरजेचे आहेत.
ही आहेत लक्षणे – जीबीएस या आजारात हात, पाय, मान, चेहरा आणि डोळ्यांत कमजोरी येते. चालताना, श्वास घेताना त्रास होतो. चावताना व गिळताना त्रास होणे ही लक्षणे आहेत.