27.7 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriरत्नागिरीतील ३ माजी आमदार पक्षांतराच्या वाटेवर सुभाष बने, कदम शिवसेनेत तर साळवी भाजपात?

रत्नागिरीतील ३ माजी आमदार पक्षांतराच्या वाटेवर सुभाष बने, कदम शिवसेनेत तर साळवी भाजपात?

शिवसेना पक्ष फुटल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते विभागले गेले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील ३ माजी आमदार लवकरच शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. जिल्ह्यातील चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुभाष बने आणि राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गणपत कदम लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबरोबरच लांजा-राजापूरचे माजी आमदार राजन साळवी येत्या ३ तारखेलाच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे. मात्र भाजपाचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी याबाबत अजून कोणताही निर्णय न झाल्याचे सांगितल्याने राजन साळवींच्या प्रवेशाविषयी शंकाकुशंका सुरु झाल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातीलराजकीय वातावरणात लवकरच मोठे बदल दिसून येणार आहेत. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते विभागले गेले आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात आणि भाजपामध्ये प्रवेश केला आहे. जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे. दापोली, खेड पासून ते राजापूर तालुक्याच्या टोकापर्यंत असलेले शिवसेनेचे कार्यकर्ते व व पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. जिल्ह्यात पक्षप्रवेशाचा धडाका लागलेला असताना शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाला वारंवार धक्के देण्यात येत आहेत.

बंड्याशेठ साळवींचा प्रवेश – नुकतेच ठाकरे गटाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख आणि रत्नागिरीचे भूतपूर्व नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघ सोडल्यास ठाकरे गटाचे बुरुज ढासळू लागले आहेत.

ऑपरेशन टायगर – राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्याम ध्ये ‘ऑपरेशन टायगर’ सुरू केल्याचे जाहीर करत अनेक ठाकरे गटातील नेते व पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात येणार असल्याचे सांगितले होते. त्याचाच एक भाग म्हणून लांजा राजापूरचे माजी आमदार गणपत कदम तसेच संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने लवकरच शिंदे गटात सहभागी होणारं आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नारायण राणेंचे समर्थक – विद्यमान भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक असलेले सुभाष बने आणि गणपत कदम यांनी नारायण राणेंबरोबर काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र कालांतराने काँग्रेस मधून नारायण राणे यांची साथ सोडून माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम यांनी अखंडीत शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांना मोठा राजकीय धक्का बसला होता.

बने, कदमांची राणेंना साथ – नारायण राणेंनी २००५ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्यावेळी बने व कदम यांनी त्यांना साथ दिली होती. आपल्या आमदारकीचा राजीनामा देत ते नारायण राणेंसोबत आले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत हे दोघेही काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. पण २०० २००९ च्या विधानसभा निवडणुकीत बनेंचा संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ फेररचनेत विभागला गेला, तर कदम पराभूत झाले. त्यानंतर नाराज झालेले सुभाष बने आणि गणपत कदम यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना स्वगृही प्रवेश दिला होता. गेली काही वर्ष शिवसेनेत असलेले बने व कदम आता ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा पक्ष प्रवेश लवकरच होणार असल्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी सांगितले आहे.

राजन साळवी भाजपात ? – याबरोबर लांजा-राजापूर विधानसभेचे माजी आम दार राजन साळवी आता भाजपवासी होणार आहेत. गेली वर्ष-दीड वर्ष त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ते भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे बोलले जाते. त्यांचा पक्षप्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित येत्या ३ तारखेला होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

चव्हाणांनी वाढविला सम्पोन्स – लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी हे भाजपा येण्याविषयी कोणतेच बोलणे झाले नसल्याचे भाजपाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.. आहे. चव्हाण यांच्या या स्पष्टीकरणाने माजी आमदार राजन साळवी यांचा भाजपातील पक्षप्रवेशाबाबत सस्पेन्स मात्र वाढला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular