26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeChiplunचिपळूण पंचायत समितीने थकवले १ लाख २१ हजार…

चिपळूण पंचायत समितीने थकवले १ लाख २१ हजार…

महावितरणच्या माध्यमातून जोरदार वसुली मोहीम सुरू आहे.

मार्च महिना जवळ आला की, सर्व आस्थापनांना वसुलीचे वेध लागतात. महावितरणमार्फत वीजबिल थकबाकीदारांची वसुली मोहीम सुरू झाली आहे. महावितरणच्या चिपळूण विभागांतर्गत तब्बल दोन कोटींची थकबाकी शिल्लक आहे. विशेषकरून यामध्ये विविध शासकीय कार्यालये थकबाकीदार आहेत. यात पंचायत समितीसह विविध शासकीय कार्यालयांचा थकबाकीदारांच्या यादीत समावेश आहे. चिपळूण पंचायत समितीकडे महावितरणची वर्षभराची १ लाख २१ हजार ६० रुपयांची थकबाकी असल्याचे पुढे आले आहे. महावितरणच्या माध्यमातून जोरदार वसुली मोहीम सुरू आहे. नागरिकांनी थकीत वीजबिल भरावे म्हणून रिक्षाच्या माध्यमातून ध्वनीक्षेपकावर आवाहन केले जात आहे. वीजबिल भरा, कारवाई टाळा अशाप्रकारचे आवाहन केले जात आहे. चिपळूण व गुहागर तालुक्यात महावितरणचे एकूण १२ हजार ९३ थकबाकीदार ग्राहक आहेत. त्यांची १ कोटी ९७ लाख ४९० रुपयांची थकबाकी आहे.

एक हजार रुपयांहून अधिक रक्कमेची ही थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. विशेषकरून शासकीय कार्यालयांची मोठी थकबाकी शिल्लक आहे. चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयांची थकबाकी लाखांच्या आसपास आहे. चिपळूण पंचायत समितीची १ लाख २३ हजार ६० रुपये तसेच दुसऱ्या ठिकाणी ५० हजार ८७० रुपयांची वसुली दिसत आहे. त्यामुळे महावितरणचे अधिकारी या वसुलीसाठी आता शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. कळंबस्ते येथील पशुसंवर्धन विभागांतर्गत असलेल्या कार्यालयाची २८ हजार २०९ रुपये, चिपळूण शहरातील परकार कॉम्प्लेक्ससमोरील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाची ६१ हजार ३१८ रुपयांची थकबाकी महावितरणकडे शिल्लक आहे.

मोठे थकबाकीदार आता रडारवर – वसुली लवकरात लवकर व्हावी यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी संबंधित कार्यालयात जाऊन कार्यालय प्रमुखांची भेट घेत आहेत; मात्र अजूनही त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे मोठे थकबाकीदार आता रडारवर आले असून, महावितरणकडून मोठ्या थकबाकीदारांकडे लक्ष वळवले आहे. बिल भरण्यासाठी संबंधित शासकीय कार्यालयांमध्ये निधीची वानवा असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular