31.5 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeEntertainmentअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बिग बॉसचा सिझन १३ जिंकणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे आज सकाळी निधन झाले. मुंबईमध्ये १२ डिसेंबर १९८० रोजी सिद्धार्थचा जन्म झाला. त्याने मॉडेल म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली. २००४  साली त्याने अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. २००८  साली बाबुल का आंगन छूटे ना या मालिकेत त्याने काम केले. पण त्याला खरी ओळख मिळाली ती बालिका वधू  या मालिकेमुळे. टीव्ही इंडस्ट्रीत लोकप्रिय झाल्यानंतर बॉलिवूडमध्येही त्याने पाय रोवायला सुरुवात केली. हंम्टी शर्मा की दुल्हनिया  या चित्रपटाद्वारे त्याने २०१४  साली बॉलिवूड डेब्यू सुद्धा केला होता.

मुंबईच्या कूपर रूग्णालयाने तसेच मुंबई पोलिसांनी सिद्धार्थच्या निधनाच्या वृत्तावर दुजोरा दिला असून सिद्धार्थच्या अचानक एक्झिटने टीव्ही इंडस्ट्री व त्याच्या चाहत्यांमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे.  मोठा धक्का बसला आहे. चाहते शोकाकूल आहेत. वयाच्या अवघ्या ४०व्या वर्षी सिद्धार्थच्या अचानक जाण्याचा अद्यापही चाहत्यांना विश्वास बसत नाहीये. हृदयविकाराच्या आलेल्या तीव्र झटक्याने त्याची प्राणज्योत मालवली.

मिळालेल्या माहितीनुसार,  सिद्धार्थने झोपण्यापूर्वी काही औषधं घेतलेली, पण सकाळी तो उठलाच नाही. त्याने कोणती आणि कशासाठी औषधं घेण्यात आली होती,  हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. रूग्णालयात नेले असता, त्याला रुग्णालयाने मृत घोषित केले. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे रूग्णालयाने सांगितले असून, गुरूवारी पहाटे रूग्णालयात येण्यापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे रूग्णालयाने स्पष्ट केले आहे.

सिद्धार्थ शुक्ला टीव्ही इंडस्ट्रीचा लोकप्रिय चेहरा होता. बिग बॉसचा १३ सिझन त्यानं जिंकला होता. याशिवाय खतरों के खिलाडी ७ चाही तो विजेता होता. बालिका वधू या मालिकेतून तो घराघरात पोहोचला होता.साधारण एक आठवड्यापूर्वी सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून केलेली पोस्ट लक्षवेधी ठरली आहे. या पोस्टमध्ये त्याने आपल्या आगामी प्रोजेक्टचे प्रमोशन केले असून, सर्व फ्रंटलाईन योद्ध्यांना  मनापासून धन्यवाद! तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालता, तासंतास काम करता आणि जे रुग्ण त्यांच्या कुटुंबियांसोबत राहू शकत नाहीत त्यांची काळजी घेता. आपण खरोखर सर्वात धाडसी आहात!

RELATED ARTICLES

Most Popular