25.2 C
Ratnagiri
Wednesday, February 12, 2025

बारावी परीक्षा ३८ केंद्रांवर सुरूपुष्प देऊन प्रोत्साहन…

बारावीच्या लेखी परीक्षेला आज शांततेत सुरुवात झाली....

चारचाकी असलेल्या बहिणी अडचणीत, जिल्हा प्रशासनाला यादी प्राप्त

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत लाभार्थी असलेल्या...
HomeRatnagiriसौरदिव्याने उजळली जिल्ह्यातील ५५५ घरे…

सौरदिव्याने उजळली जिल्ह्यातील ५५५ घरे…

मोठ्या प्रमाणात विजेची बचत होण्यास मदत होणार आहे.

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीजयोजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात १ हजार ६०२ ग्राहकांनी महावितरणकडे अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ५५५ लाभार्थ्यांच्या घराच्या छतावर सौरपॅनल बसले आहे. इतक्या लोकांच्या घरात आता सौरदिवे पेटले आहेत. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीजयोजनेला ‘महावितरण’च्या रत्नागिरी परिमंडळात प्रतिसाद मिळत या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विजेची बचत होण्यास मदत होणार आहे. महिनाभरात ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. प्रधानमंत्री सूर्यधर मोफत वीज योजनेत केंद्र सरकारकडून छतावरील सौरऊर्जा निर्मितीचे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसवणाऱ्या वीजग्राहकांना एक किलोवॉट क्षमतेच्या प्रकल्पाला ३० हजार रुपये, दोन किलोवॉट क्षमतेच्या प्रकल्पाला ६० हजार रुपये व तीन किलोवॉट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला ७८ हजार रुपये अनुदान मिळते.

एक किलोवॉटच्या सौरयंत्रणेतून दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. २ किलोवॉट सौरयंत्रणेतून दरमहा २४० युनिट तर ३ किलोवॉटमधून ३६० युनिट वीज तयार होते. २५ वर्षांपर्यंत वीजनिर्मिती क्षमता आहे. छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पात निर्माण झालेली वीज घरात वापरायची. प्रकल्पात गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्याने वीजबिल शून्य येते तसेच अतिरिक्त वीज ‘महावितरण’ला विकता येते याशिवाय, सौरऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते. तसेच ग्राहकांनाही आर्थिक लाभ होतो. छतावर सौरऊर्जा प्रकार बसवल्यावर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. वीजबिल शून्य येते तसेच नैसर्गिक स्रोतापासून अक्षय ऊर्जा या माध्यमातून बीज उपलब्ध होते. यासाठी शासनाचे अनुदान आहे तसेच, हरित ऊर्जा धोरण राबवण्यासाठी पोषक असून, सौरयंत्रणेची वॉरंटीही उपलब्ध आहे. स्वतःच्या खचनि जरी सौरयंत्रणा बसवली तरीही कालांतराने परवडते. अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.

संकेतस्थळावर योजनेची माहिती – वीजग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in/या संकेतस्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध आहे तसेच नोंदणी करण्यासाठी पीएम-सूर्यघर हे अत्याधुनिक मोबाईल अॅप उपलब्ध आहे. त्यावर नोंदणी केल्यावर छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो.

RELATED ARTICLES

Most Popular