25.1 C
Ratnagiri
Wednesday, February 12, 2025

बेकायदा मासेमारी; चार नौंकाना दंड – मत्स्यविभाग

राज्याच्या सागरी जलदी क्षेत्रात घुसखोरी किंवा बेकायदा...

ऑपरेशन शिवधनुष्य! उपमुख्यमंत्री शिदेच्या उपस्थितीत शनिवारी पुन्हा उबाठाला रिंवडार पडणार

राज्यातील 'ऑपरेशन शिवधनुष्य'चा आरंभ जानेवारीत रत्नागिरी मतदारसंघात...

साखरी नाटे किनाऱ्यावरील अतिक्रमणप्रश्नी नोटीस द्या

अतिक्रमणमुक्त मिरकरवाडा मत्स्य बंदरावर प्राधान्याने संरक्षक भिंत...
HomeRatnagiri'जलजीवन'ची खोदाई पाडली बंद - कोळकेवाडी ग्रामस्थ

‘जलजीवन’ची खोदाई पाडली बंद – कोळकेवाडी ग्रामस्थ

हा गाव दरडप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो.

तालुक्यातील कोळकेवाडी येथे जलजीवन मिशन योजनेतील खोदाईच्या कामास ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवल्यानंतर काम बंद ठेवण्यात आले. खोदाईच्या पार्श्वभूमीवर कोळकेवाडीसह नागावेतील ग्रामस्थदेखील आक्रमक झाले आहेत. या दोन्ही गावांच्या ग्रामस्थांची संयुक्त बैठक कोळकेवाडी ग्रामपंचायतीत रविवारी (ता. ९) होणार आहे. यात आंदोलनाची पुढील दिशा ठरण्याची शक्यता आहे. कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीद्वारे तालुक्यातील अडरे, अनारी परिसरातील २२ गावांसाठी पाणीयोजना राबवण्यात येत आहे. या योजनेसाठी कोळकेवाडी गावातून खोदकाम केले जात आहे. मुळातच हा संपूर्ण परिसर कोळकेवाडी धरण व्यवस्थापनाच्या अंतर्गत येतो, शिवाय हा गाव दरडप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. सद्यःस्थितीत गावात केल्या जात असलेल्या खोदकामामुळे तेथील वाड्यावस्त्यांना धोका निर्माण झाला आहे. तरी हे खोदकाम तातडीने थांबवावे, अशी मागणी कोळकेवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभागाच्या उपअभियंत्याकडे केली होती.

त्याची दखल घेण्यात आली नाही. उपसरपंच सचिन मोहिते व माजी सरपंच नीलेश कदम यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या समस्येला वाचा फोडली. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याने जलजीवन मिशन योजनेतील खोदाईचे काम ताप्पुरते थांबवण्यात आले आहे. कोळकेवाडी, नागावे गाव प्रकल्पबाधित असून, कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यासाठी येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या. शासनाची कोणतीही योजना राबवायची झाली तर कोळकेवाडी धरण व्यवस्थापनाकडे परवानगी मागितली जाते. ग्रामपंचायतीकडून अंगणवाडी, शाळा, व्यायामशाळा, सहकार सेवा सोसायटी आदी इमारत उभारणीसाठी जागेची मागणी केली असता, जागा देण्यास नकार दिलेला आहे.

आजपर्यंत कोळकेवाडी धरणातून या परिसरात अनेक गावांना ग्रॅव्हिटी पाणीयोजना केलेल्या आहेत. या योजनांसाठी प्रत्येकवेळी या गावातून खोदकाम केले गेले आहे. ग्रामपंचायतीने कधी परवानगी मागितली तर ती न देणारी धरण व्यवस्थापन बाहेरील गावांसाठी पाणीयोजनांना परवानगी दिली आहे. या परिसरात पाणीयोजनेसाठीच्या मोठा जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी विहीर खोदाई सुरू आहे. याच खोदकामांच्या वरील बाजूस ज्या वाड्या वसल्या आहेत तेथे अतिवृष्टीत जमिनीला भेगा पडलेल्या आहेत. भूगर्भशास्त्रज्ञांनी केलेल्या पाहणीत या वाड्यांचे पुनर्वसन करण्याची सूचना केली आहे. येथील वाड्यांना पावसाळ्यापूर्वी स्थलांतराचे आदेश दिले जातात; मात्र त्यांना पुनर्वसनासाठी गावात जमिनी दिल्या जात नाहीत. या शेतकऱ्यांना अद्याप पुनर्वसनातील जमिनी मिळालेल्या नाहीत. या परिस्थितीत इतर गावांतील कुटुंबांचे येथे पुनर्वसन केले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पाणीयोजनेतील शुद्धीकरण प्रकल्पाच्या खोदकामास विरोध दर्शवला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular