26.3 C
Ratnagiri
Tuesday, April 22, 2025

खराब तापमानामुळे सागरी मासेमारीवर परिणाम

सर्वसाधारणपणे गुढीपाडवा झाला की समुद्रात नव्याने मासळी...

शेकाप नेत्याच्या दोन मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे...

रत्नागिरीत खेडशी परिसरात उपयुक्त पाळीव प्राणी मुंडकं छाटलेल्या स्थितीत सापडल्याने संताप

रत्नागिरी तालुक्यात रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर खेडशी...
HomeRatnagiriबेकायदा मासेमारी; चार नौंकाना दंड - मत्स्यविभाग

बेकायदा मासेमारी; चार नौंकाना दंड – मत्स्यविभाग

बेकायदा मासेमारी करणाऱ्या १६ नौका आतापर्यंत ड्रोन कॅमेऱ्याने टिपल्या.

राज्याच्या सागरी जलदी क्षेत्रात घुसखोरी किंवा बेकायदा मासेमारी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे हवाई गस्त सुरू आहे. बेकायदा मासेमारी करणाऱ्या १६ नौका आतापर्यंत ड्रोन कॅमेऱ्याने टिपल्या. या नौकांवर मत्स्यविभागाकडून कारवाई सुरू आहे. त्यापैकी ४ नौकांची सुनावणी पूर्ण झाली असून, त्यांच्यावर सुमारे ४ लाख ८० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मत्स्य व्यवसाय खात्याने ही अधिकृत माहिती दिली. जिल्ह्याच्या जलदी क्षेत्रामध्ये बेकायदा मासेमारीला लगाम घालण्यासाठी शासनाने ड्रोन कॅमेऱ्याद्वारे गस्त सुरू केली आहे. जिल्ह्याच्या किनाऱ्यावर दोन कॅमेरेही गस्त घालत आहेत. पर्ससीन नौका, १२ वावाच्या आत मासेमारी करणाऱ्यांवर ही कारवाई केली जाते. ड्रोन कॅमेरे अशा नौकांवर पाळत ठेवून असतात. अशा नौकांचा फोटो आणि रजिस्ट्रेशन नंबर तत्काळ मत्स्यविभागाला जातो.

त्यानंतर संबंधित मालकांवर कारवाई केली जाते. आतापर्यंत ड्रोन कॅमेऱ्यामुळे बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या १६ नौकांवर कारवाई झाली आहे. मत्स्य व्यवसाय खात्याच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा व अन्य कागदपत्र तयार करून अधिकाऱ्यांसमोर सादर केली. या १६ पैकी ४ प्रकरणांमध्ये सुनावणी पूर्ण झाली असून, निर्णय दिले गेले आहेत. जबीन कमाल होडेकर यांच्या अलकादरी या नौकेने अनधिकृत मच्छीमारी केल्याचे दिसून आली. या नौकेला २० हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. सैनाब जावीद सुवर्णदुर्गकर यांच्या अल्सफा एम या नौकेने पर्ससीन स्वरूपाची मच्छीमारी बेकायदेशीर केल्याचे शाबित झाल्याने २ लाख रुपयांचा दंड करण्यात आला.

निलोफर अ. हमीद माजगावकर यांच्या अब्दुला हुसैन या नौकेने बेकायदा पर्ससीन मच्छीमारी केल्याचे ड्रोनच्या नजरेत दिसून आले आणि तसे शाबित झाले म्हणून १ लाख ४० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. गजाला साकिब साखरकर यांच्या मोहम्मद जलाल या नौकेने बेकायदा पर्ससीन मच्छीमारी केल्याचे आढळून आल्याने या नौकाचालकाकडून १ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

छायाचित्रासह नोंदणी क्रमांकाचा आधार – जिल्ह्याच्या किनाऱ्यावर दोन कॅमेरेही गस्त घालत आहेत. पर्ससीन नौका, १२ वावाच्या आत मासेमारी करणाऱ्यांवर ही कारवाई केली जाते. ड्रोन कॅमेरे अशा नौकांवर पाळत ठेवून असतात. अशा नौकांचा फोटो आणि रजिस्ट्रेशन नंबर तत्काळ मत्स्यविभागाला जातो. त्यानंतर संबंधित मालकांवर कारवाई केली जाते. आतापर्यंत ड्रोन कॅमेऱ्यामुळे बेकायदा मासेमारी करणाऱ्या १६ नौकांवर कारवाई झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular