25.2 C
Ratnagiri
Wednesday, February 12, 2025

बारावी परीक्षा ३८ केंद्रांवर सुरूपुष्प देऊन प्रोत्साहन…

बारावीच्या लेखी परीक्षेला आज शांततेत सुरुवात झाली....

चारचाकी असलेल्या बहिणी अडचणीत, जिल्हा प्रशासनाला यादी प्राप्त

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत लाभार्थी असलेल्या...
HomeRatnagiriअल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला २० वर्षे सक्तमजूरी १६ हजार रुपये दंड

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला २० वर्षे सक्तमजूरी १६ हजार रुपये दंड

अल्पवयीन मुलीला वेगवेगळी आमिषे देखील दाखवली होती.

सोशल मिडियावर एका अल्पवयीन मुलीला भुरळ घालून त्यानंतर त्या मुलीला पळवून नेत तिच्यावर कोल्हापूर येथे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने लांजा गुरववाडी येथील विवाहीत तरुणाला २० वर्षे सक्तमजुरी तर १६ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. ही घटना १ मे २०२३ रोजी घडली होती. रूपेश महादेव गुरव असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या विवाहीत तरुणाचे नाव आहे. हा प्रकार २०२३ रोजी लांजा गुरववाडी येथे घडला होता. या प्रकरणात एका ३१ वर्षीय विवाहित तरूणाने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या पाशात ओढत तिच्याशी जवळीक साधली होती. या मुलीला वेगवेगळी आमिषे दाखवली होती.

सोशल मिडियावर मैत्री – रूपेश याने सोशल मिडियावरून अनेक मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या होत्या. या सोशल मिडियाच्या माध्यमातून त्याने एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केली होती. सुरूवातीला सोशल मिडियाच्या माध्यमातून तो तिच्याशी गप्पा मारू लागला. त्याची मैत्री अधिकच घट्ट झाली होती. रूपेश याने या अल्पवयीन मुलीला वेगवेगळी आमिषे देखील दाखवली होती. नेहम ीच सोशल मिडियातून संपर्क साधून तो तिला बाहेर फिरायला जाऊया, असे सांगत असे. मात्र ती त्याला नकार देत होती. रूपेश याने तिला पळवून नेण्याचा प्लॅन आखला होता.

अखेर फुस लावून पळविले – रूपेश याच्या मनात भलतेच काहीतरी चालले होते त्याने खूप काही स्पप्ने रंगवली होती. ती स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होता. एक दिवस त्याने आपला प्लॅन फत्ते करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर रुपेश यांने अल्पवयीन मुलीला फुस लावून विशाळगड येथे फिरायला नेतो असे सांगून तिला घेवून तो निघून गेला. रूपेश याने अल्पवयीन मुलीच्या पालकांनादेखील आपल्या बोलण्याने भुरळ पाडली होती. तिला घेऊन मी फिरायला जातोय असे सांगून पालकांच्या ताब्यातून त्याने सोळजाई मंदिर-देवरुख येथून दुचाकीवरुन घेऊन कोल्हापूर येथे घेऊन गेला होता.

लैंगिक अत्याचार – कोल्हापुरात पोहोचल्यानंतर येथील एका मोबाईल टॉवरच्या ठिकाणी तो त्या मुलीला घेऊन गेला. त्या मुलीवर त्याने लैंगिक अत्याचार केला. काही दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला आणि रूपेश याचे बिंग फुटले. पालकांनी पोलीस स्थानकात धाव घेतली. या प्रकरणी देवरुख पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध फुस लावून पळवुन नेणे, लैगिंक अत्याचार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तपास देवरुख पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार करत होते. तपासात पोलिसांनी आरोपी रुपेश गुरव याला अटक केली होतीः

२० वर्षे सक्तमजुरी – या प्रकरणात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. गेली दोन वर्षे तो न्यायालयीन कोठडीत होता. मंगळवारी या खटल्याचा निकाल प्रमुख जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे अॅड. मेघना नलावडे यांनी काम पाहिले. दोन्ही पक्षातर्फे झालेल्या युक्तीवादात सरकारी पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने साक्षीदार आणि वैद्यकीय पुरावा ग्राह्य मानून आरोपी रुपेश गुरव याला भादवी कलम ३६३ मध्ये ३ वर्षे शिक्षा, २ हजार रुपये दंड. ३७६ मध्ये २० वर्षे शिक्षा, ५ हजार रुपये दंड. ३७६ (२) (जे) १० वर्षे शिक्षा २ हजार दंड, लैगिंक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ (पोक्सो) ३, ४, ७, ८ अन्वये २० वर्षे शिक्षा व ३ वर्षे शिक्षा व ५ हजार वं २ हजार दंड. अशी एकूण २० वर्षे सक्षम कारावास व १६ हजार रुपयांचा दंड ठोठावला. या खटल्यात प्रमुख पैरवी म्हणून पोलिस उपनिरीक्ष योगेश खोंडे व महिला पोलिस हवालदार वर्षा चव्हाण यांनी काम पाहिले.

RELATED ARTICLES

Most Popular