28.4 C
Ratnagiri
Monday, March 24, 2025

मुंबईसमोर चेन्नईचे फिरकीचे जाळे ? सलामीलाच आमनेसामने

सर्वाधिक आणि प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकणारे...

घरपट्टी थकवणाऱ्या ६४ मालमत्ता सील रत्नागिरी पालिकेची कारवाई

घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका अॅक्शन मोडवर...

कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार : ना. नितेश राणे

कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या...
HomeRatnagiriमांडवी किनाऱ्यावर फिरण्यासाठी गेलेल्या तरुण वकीलावर तिघांचा जीवघेणा हल्ला

मांडवी किनाऱ्यावर फिरण्यासाठी गेलेल्या तरुण वकीलावर तिघांचा जीवघेणा हल्ला

तोंड वाळूत खुपसून त्यांना गुरमरून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

व्यक्ती त्यांच्या दिशेने आला व गाडीकडे बघुन गाडीवरील लोगो एकटक पाहत होता. त्यांनतर तो संशयित गाडीच्या पुढील बाजूस येऊन उभा राहिला. त्यावेळी त्याचे अन्य दोन साथीदार त्याठिकाणी आले. त्यातील एकाने कल्पेश यांना गांजा आहे का? अशी विचारणा केली. त्यावर कल्पेश यांनी आपल्याकडे गांजा वगैरे असे काहीच नाही असे सांगताच त्यातील एकाने हा वकिल आहे, असे म्हणत त्यापैकी एकाने अचानक जाधव यांची मान हातांच्या बगलेमध्ये धरुन मारण्याच्या हेतुने दाबली. त्यानंतर अन्य दुसऱ्या संशयिताने कल्पेश यांच्या गाडीला लावलेले हॅल्मेट काढून ते हॅल्मेट कल्पेश यांच्या डोक्यात मारले. त्या तिघांनी मिळून लाथाबुक्याने मारहाण केली. कल्पेश यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशानेच त्यांच्यावर हल्ला केला होता.

कल्पेश यांचे तोंड वाळूत खुपसून त्यांना गुरमरून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मारहाणीत जखमी झालेल्या जाधव यांनी कशीबशी सुटका करून तेथून पळ काढला. मात्र ते पळत असतानाच त्या तिघांनी हातात काचेच्या बाटल्या घेऊन पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दिशेने काचेच्या बाटल्या फेकल्या. त्यानंतर त्या तिन इसमांनी जाधव यांची दुचाकी गाडीवर लाथा मारुन नुकसान केले. याप्रकरणी कल्पेश जाधव यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार केली असून पोलीसांनी तिघा संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८ (१), ११५ (२), १२५, ३२४ (४), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular