30.8 C
Ratnagiri
Wednesday, March 12, 2025

चिपळूण – कऱ्हाड रेल्वेमार्गाचे स्वप्न अधांतरीच, खासदार तटकरे यांचे आश्वासनही हवेत

राज्याच्या अर्थसंकल्पात चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात...

राजापूर तालुक्यात डॉक्टर नियुक्तीमधील धरसोडीमुळे संताप

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर नसताना कंत्राटी...
HomeRatnagiriमहायुती सरकारचं करायचं काय? काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणांनी रत्नागिरी दणाणली

महायुती सरकारचं करायचं काय? काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणांनी रत्नागिरी दणाणली

शेतकऱ्यांचे, मच्छीमारांचे व जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आमच्या म ागण्या मान्य कराव्यात.

‘या महायुती सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय’ अशा गगनभेदी घोषणा देत रत्नागिरीत मच्छिमार, आणि रखडलेल्या महाम सोतकरी प्रश्नासाठी काग्रेसने जोरदार निदर्शने केली. मागील काळातील सर्व आश्वासने गेली कुठे? असा सवाल करत हे सरकार निष्क्रीय सरकार असल्याची टीका काँग्रेसचे जिल्हा प्रभारी मनेष राऊत यांनी यावेळी केली. शेतकरी व मच्छिमारांना न्याय द्या, तसेच रखडलेला महामार्ग मे अखेर पूर्ण करा, अशा विविध मागण्या घेऊन सोमवारी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी मनेष राऊत यांच्यासह सहदेव बेटकर, महिला जिल्हाध्यक्ष अॅड. विभावरी जाधव, अॅड. अश्विनी आगाशे, रुपाली सावंत, मिनल गुरव, अशोकराव जाधव, रवी खेडेकर, रमेश शहा, हरिस शेकासन, अनिता शिंदे, कैस फणसोपकर, हनिफ खलपे, दिलीप मोहिते, जैनूल सारंग, काका तोडणकर आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. महायुती सरकारविरोधात निदर्शने केल्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

सरकारविरोधात असंतोष – यावेळी बोलताना मनेष राऊत म्हणाले की, शेतकऱ्यांमध्ये व मच्छीमारांमध्ये राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. मच्छीमारांचे व शेतकऱ्यांचे अत्यंत ज्वलंत प्रश्न आहेत. महाराष्ट्रातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते परंतु त्याची पूर्ततेसाठी सरकारकडून कोणतेही प्रयत्न सुरू असल्याचे दिसत नाही.

आश्वासनाचे काय? – शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, य सर्व आश्वासनांचे काय झाले? सत्तेत येण्याकरिता आश्वासनांचा पाऊस पाडून सत्तेत येताच महायुती सरकार शेतकऱ्यांकडे, मच्छीम ारांकडे व सामान्य जनतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करत महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेले कर्ज माफीचे व हमी भावचे आश्वासन पूर्ण करण्याकरिता निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

तारीख पे तारीख… – रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. महामार्ग जवळ जवळ दोन दशक उलटून गेली तरी पूर्ण होत नाही, सरकारच्यावतीने प्रत्येक वर्षी नवीन तारीख जाहीर करण्यात येते, मंत्री बदलतात मात्र महामार्गाची परिस्थिती बदलत नाही, ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले आहे ते निकृष्ट दर्जाचे असल्याने अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या आहेत. तर काही ठिकाणी रस्ता किंवा संरक्षक भिंत खचल्याची उदाहरणे समोर येत आहेत, असा आरोप मनेष राऊत यांनी यावेळी बोलताना केला.

चौकशीची मागणी – काँग्रेसच्यावतीने जिल्हा या कामाची तज्ञ मंडळी मार्फत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. महाम ार्गाच्या चौपदरीकरणाचे कामात मोठ्या प्रमाणात सरकारचा महसूल बुडवला आहे का? याची सुद्धा चौकशी होणे आवश्यक आहे, असे मनेष राऊत म्हणाले.

आरोग्यसेवेचे तीन-तेरा –रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली असून शासकीय रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. अनेक पदे रिक्त आहेत. शिकाऊ डॉक्टर रुग्णांवर इलाज करत आहेत. महाराष्ट्र शासनाचा रत्नागिरी जिल्ह्यातील गोरगरीब जनतेच्या जीवाशी खेळ सुरू आहे. शासकिय रुग्णालयाची इमारत मोठी होत आहे. नवीन ऑपरेशन थिएटर बांधण्यात आले. मात्र ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन करण्याकरिता सर्जन नाहीत, भूलतज्ज्ञ नाहीत, ओ. पी. डी. व अपघात विभाग पूर्णपणे शिकाऊ वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या भरवश्यावर चालत आहे. युती सरकारने त्वरित शासकिय रूग्णालयात योग्य वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

मूलभूत सुविधा द्या! – रत्नागिरीचे मिरकरवाडा बंदर देशाला मोठ्या प्रमाणात परकिय चलन मिळवून देणारे बंदर असताना, त्या ठिकाणी मच्छिमार बांधवांसाठी मूलभूत सुविधांची उणीव आहे. शासनाने मि रकरवाडा बंदराचे काम जलद गतीने पूर्ण करण्याकरिता अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घ्यावा. किमान मिरकरवाडा बंदरावर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्वरित करावी. त्याच बरोबर मच्छिमारा साठी विशेषतः महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी, अशी मागणी राऊत यांनी ‘यावेळी केली.

चालू अधिवेशनात न्याय द्या – सोमवार ३ मार्च पासून राज्य शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. आमच्या मागण्या रास्त व जनहिताच्या आहेत; त्यामुळे या अधिवेशनामध्ये शासनाने शेतकऱ्यांचे, मच्छीमारांचे व जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आमच्या म ागण्या मान्य कराव्यात, अशी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular