26.7 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeKokanगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोल माफ

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोल माफ

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना मागील वर्षीप्रमाणे पथकरातून सवलत देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने आवश्यक त्या वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, अपर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्री. देबडवार, पथकर कंपन्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून कोकणात जाणारे सर्व रस्ते, महामार्ग सुस्थितीत करणे गरजेचे आहे. भाविकांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची उर्वरित कामे येत्या दोन दिवसांत गणेशोत्सवापूर्वी युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. जर त्यामध्ये काही दिरंगाई दिसली तर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना मागील वर्षीप्रमाणे पथकरातून सवलत देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे, या पथकर सवलतीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना लावण्यासाठीचे स्टीकर्स तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत

कोकणात जाणाऱ्या मार्गावर स्थानिक पोलीसांबरोबरच महामार्ग वाहतूक पोलीस देखील तैनात करण्यात आले असून भाविकांना कोणत्याही अडी-अडचणीचा सामना करायला लागू नये, वाहतूक खोळंबू नये यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यांची पेंडिंग कामांना सुद्धा वेग आला असल्याचे दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular