23.2 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriअतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, चिपळूणवासीय भीतीच्या छायेखाली

अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, चिपळूणवासीय भीतीच्या छायेखाली

तहसीलदार सूर्यवंशी यांनी चिपळूण नगरपालिका आणि पूर बाधित ग्रामपंचायतींना सावधगिरी बाळगण्याचा आणि अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे.

भारतीय हवामान खात्यातर्फे येत्या चार दिवसांत रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली असून, जिल्ह्याला सोमवारी सकाळपासूनच पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. दिवसभर मुसळधार पाऊस पडत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर पावसाने एवढा जोर धरल्याने गणेशभक्तांमध्ये काळजीचे वातावरण पसरले आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याने पुढील चार दिवस पावसाची संततधार कायम राहणार असून ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.

चिपळूणमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे महापुराच्या भीतीने नागरिकांचा डोळ्याला डोळा लागला नाही. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. तहसीलदार सूर्यवंशी यांनी चिपळूण नगरपालिका आणि पूर बाधित ग्रामपंचायतींना सावधगिरी बाळगण्याचा आणि अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे. १० तारखेपर्यंत असलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याने चिपळूणवासियांना २२ जुलैची परिस्थिती आठवत आहे. त्यामुळे चिपळूणवासीय भीतीच्या छायेखाली आहेत. नगर पालिका वारंवार नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करत आहे.

दापोलीमध्ये देखील तुफानी पडणाऱ्या पावसामुळे अनेकानी रात्र जागूनच काढल्या. दापोलीमध्ये प्रथमच  एवढ्या पाणी वाढल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणी आले आहे. दापोली शहरातील केळकर नाका शिवाजीनगर, नागर गुडी, प्रभू आळी, जालगाव खलाटी, भारत नगर या परिसरामध्ये पुराचे पाणी चार ते पाच फूटापर्यंत वाढल्याने अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसले, लोकांची एकच तारांबळ उडाली. रात्री एक नंतर पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने पाणी ओसरायला लागल्यावर, नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

RELATED ARTICLES

Most Popular