26.6 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeChiplunरखडलेल्या चिपळूण बसस्थानकाचा लवकरच शुभारंभ - आ. शेखर निकम

रखडलेल्या चिपळूण बसस्थानकाचा लवकरच शुभारंभ – आ. शेखर निकम

स्थानकाच्या बांधकामासाठी २ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

हायटेक धर्तीवर बांधण्यात येत असलेल्या चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकाच्या बांधकामासाठी आ. शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश आले असून निधीसाठी मुंबई येथे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्या दालनात झालेल्या बैठकीत या बस स्थानकाच्या बांधकामासाठी २ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याची निविदा प्रक्रियेची कार्यवाही लवकरच होणार असल्याने रखडलेल्या हायटेक मध्यवर्ती बस स्थानकाच्या बांधकामाचा आणखीनच मार्ग म ोकळा झाला आहे. चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकाची इमारत तोडून त्या जागी नव्याने बस स्थानक बांधण्यास काही वर्षांपूर्वी प्रारंभ झाला. यानंतर ठेकेदार व एस.टी. महामंडळ यांच्या उदासीन भूमिकेमुळे या बस स्थानकाच्या बांधकामाचा सुरुवातीपासूनच बट्ट्याबोळ उडाला. इमारतीच्या पायाचे काम परवडत नसल्याने त्यावेळच्या ठेकेदाराने बांधकाम अर्धवट सोडून दिले होते. यानंतर एस.टी. महामंडळाने त्या ठेकेदाराचा ठेका रद्द करून पुनर्बाधणीची नवीन निविदा काढली.

नव्या ठेकेदाराची नियुक्ती केल्यानंतर त्याने पाया तसेच पहिल्या स्लॅबचे बांधकाम पूर्णत्वास नेले. मात्र, काही महिन्यांपासून हे बांधकाम बंद अवस्थेत आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने या प्रश्नी आमदार शेखर निकम यांनी परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्याकडे रखडलेल्या बस स्थानकासंदर्भात वाढीव निधीची तरतूद करावी व यासाठी बैठकीचे आयोजन करावे, असे पत्रे दिले होते. या मागणीनुसार गुरुवारी मुंबई येथे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत चिपळूणमध्ये रखडलेल्या हायटेक मध्यवर्ती बस स्थानक प्रश्नाबाबत चर्चा झाली. यानंतर ना. संरनाईक यांनी या बसस्थानकाच्या बांधकामासाठी २ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीच्या अनुषंगाने येत्या काही दिवसातच निविदा प्रक्रिया पूर्णत्वास जाऊन रखडलेल्या बस स्थानकाच्या कामाला वेग मिळणार आहे,

चिपळूण शहरातील जुन्या स्टॅन्डची दुरावस्था झाली असून या स्टँडचे सुशोभीकरण व्हावे तसेच परिसर विकसित व्हावा, अशी मागणी आ. शेखर निकम यांनी परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्याकडे केलो. यावर ना. सरनाईक यांनी एस.टी. महामंडळाच्या बांधकाम प्रशासनाला आराखडा बनवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात सावर्डे बस स्थानक तोडण्यात आले आहे. या बस स्थानकाची पुनर्बाधणी व्हावी, हा मुद्दादेखील आ. शेखर निकम यांनी यावेळी उपस्थित केला. या बस स्थानकाला परिवहन मंत्री ना. सरनाईक यांनी सकारात्मकता दाखवत आराखडा बनवण्याचे आदेश दिले. आहेत. यावेळी आमदार शेखर निकम यांच्यासह महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बांधकाम महाव्यवस्थापक दिनेश महाजन, कोकण विभागीय बांधकाम कार्यकारी अभियंता सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुका अध्यक्ष नितीन ठसाळे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular