25.3 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRajapurराजापूर न. प. ची थकबाकी वसूली मोहिम

राजापूर न. प. ची थकबाकी वसूली मोहिम

तब्बल १९ नळ कनेक्शन बंद करण्यात आली आहेत.

आर्थिक वर्षअखेर अर्थात मार्च अखेर असल्याने राजापूर नगर परिषदेने वसूली मोहिम धडाकेबाज पध्द्‌तीने सबवली आहे. यासाठी नगरपरिषदेने वसूलीसाठी पथके नेमलेली असून थकबाकीदार यांची तब्बल १९ नळ कनेक्शन बंद करण्यात आली आहेत. दरम्यान राजापूर नगरपरिषद हद्दीतील थकबाकी असलेले मिळकतधारक, त्यांचे भोगावटधारक, नळपट्टीधारक, गाळाधारक यांना न.प.च्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे. नगरपरिषदेचे आर्थिक वर्ष २०२४-२५ हे ३१ म ार्च अखेर संपुष्टात येत असल्याने नगर परिषदेकडून कर वसूलीचे उद्दिष्ट मागील उद्दिष्टांपेक्षा कमीत कमी दहा टक्के वाढविणे जरूरीचे आहे. शासनाकडील वसूलीची टक्केवारी वाढल्यास यावर अनुदान देणे बंधनकारक केलेले आहे. यासाठी वसूलीसारखी कारवाई नगर परिषदेने सुरू केलेली आहे. आतापर्यंत एकूण १९ नळ कनेक्शन बंद करण्यात आलेली आहेत अशी माहिती देण्यात आली.

थकबाकी असलेले मिळकतधारक त्यांचे भोगावटधारक, नळकनेक्शनधारक व गाळेधारक यांनी कराच्या रक्कमा नगरपरिषद कार्यालयात लवकरात लवकर भरणा करून नगर परिषदेला सहकार्य करावे अथवा नळ कनेक्शन बंद करणे तसेच जप्तीवसूली सारखी कठोर कारवाई करून कराचा भरणा नगर परिषदेकडे वसूलात आणण्यात येईल. शिवाय थकबाकीधारकांची नावे शहरातील चौकामध्ये प्रसिध्द करण्यात येणार आहेत. याबाबत मानहानीचे प्रसंग’ उद्भवल्यास नगर परिषद जबाबदार राहणार नाही याची सर्व थकीत करधारकांनी नोंद घ्यावी व कारवाईसारखे कटू प्रसंग टाळावेत असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात. आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular