32 C
Ratnagiri
Friday, November 15, 2024

अख्खा कोकण अदानीच्या घशात घालण्याचा डाव ! युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे

अख्खा कोकण अदानीच्या घशात घालण्याचा डाव आपल्याला...

राजापुरातील गायब तोफा चर्चेत…

राजापूर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील इतिहासकालीन दोन तोफांपैकी...
HomeRatnagiriगणेशरुपी नीरज चोप्रा, साकारला रत्नागिरीमध्ये

गणेशरुपी नीरज चोप्रा, साकारला रत्नागिरीमध्ये

डॉ. देशमुख गेल्या १५  वर्षांहून अधिक काळ संसारे यांच्याकडूनच रत्नागिरीमधून मूर्ती नेत आहेत. त्यांना वेगवेगळ्या थीममधील गणपती साकारण्याची आवड आहे.

“हौसेला मोल नाही” म्हणतात याची उक्ती नक्कीच या बातमीवरून येईल. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक खेळामध्ये देशाचे नाव सुवर्णाक्षरांमध्ये कोरणाऱ्या नीरज चोप्राची प्रसिद्धीने तर आत्ता हद्दच पार केली आहे. भारताला सुवर्णपदक मिळवून दिलेल्या आणि भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या नीरज चोप्रावरील सर्वांचे प्रेम दिवसागणिक वाढतच आहे.

पुण्यातील एका स्पोर्ट्स अकादमीला त्याचे नाव दिल्यानंतर आता तर नीरजच्या रूपातील चक्क गणेशमूर्ती आकार घेऊ लागली आहे. रत्नागिरीतील मूर्तिकार आशिष संसारे यांनी भालाफेक करणारी गणेशाची सुबक मूर्ती साकारली आहे. या गणेशमूर्तीची स्थापना मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या मुंबईतील घरी या गणेशोत्सवामध्ये होणार आहे. माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख हे स्वतः खूप हौशी असून दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या गणेशमूर्तीची स्थापना करण्याची त्यांना आवड आहे.

यंदा सुवर्णपदक मिळविलेल्या नीरज चोप्राच्या स्वरूपात गणेशमूर्ती सकारावी, असे त्यांच्या मनात आले. त्यांनी ही संकल्पना मूर्तिकार आशिष संसारे यांना बोलून दाखविली. त्यानुसार मूर्तिकार संसारे यांनी निरजच्या स्वरूपातील भालाफेक करताना अत्यंत सुबक मूर्ती साकारली आहे. ही गणेशमूर्तीची उंची दीड फूटाची आहे. शाडू मातीमध्ये भालाफेक करतानाची अशी वेगळ्या प्रकारची गणेशमूर्ती साकारणे म्हणजे ही मूर्ती साकारणे एक प्रकारचे आव्हानच असल्याचे संसारे यांनी सांगितले.

डॉ. देशमुख गेल्या १५  वर्षांहून अधिक काळ संसारे यांच्याकडूनच रत्नागिरीमधून मूर्ती नेत आहेत. त्यांना वेगवेगळ्या थीममधील गणपती साकारण्याची आवड आहे. आशिष संसारे हे रत्नागिरीतील प्रसिद्ध मूर्तिकार असून त्यांचा पिढीजात गणेशमूर्ती कारखाना आहे. आणि त्यांचा हा वारसा आशिष संसारे यशस्वीपणे सांभाळत आहेत. माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या मुंबईतील घरी जाण्यासाठी ही गणेशमूर्ती आज ७ सप्टेंबर रोजी रत्नागिरीतून प्रवास करणार आहे. देशमुख यांचे मित्र राहुल औरंगाबाद हे या गणेशमूर्तीला रेल्वेने मुंबईपर्यंत नेणार आहेत. मूर्ती शाडू मातीची असल्याने अत्यंत सावधगिरीने ही मूर्ती नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

RELATED ARTICLES

Most Popular