26 C
Ratnagiri
Saturday, September 6, 2025

एसटी प्रशासनाकडून लोकेशन अॅप’ची केवळ घोषणा

लालपरी'चे अचूक ठिकाण मोबाईलवर दिसेल, बस वेळेवर...

पीकविमा योजनेत खेड-दापोली आघाडीवर…

प्रधानमंत्री पीकविमा योजना यंदा नव्या स्वरूपात रत्नागिरी...

परतीचा प्रवास ठरला कोंडीचा… वाहनांच्या रांगा

गौरी-गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास बुधवारपासून सुरू...
HomeDapoliमहामार्ग, बसस्थानक स्वच्छतागृहाचे काम लवकरच मार्गी -सुनील तटकरे

महामार्ग, बसस्थानक स्वच्छतागृहाचे काम लवकरच मार्गी -सुनील तटकरे

वेळेत रस्त्याचे काम पूर्ण करणार असल्याचे तटकरे यांनी आश्वस्त केले.

मंडणगड तालुक्यातील प्रलंबित विकासाच्या प्रश्नांवर राज्य व केंद्रशासनाच्या स्तरावर पाठपुरावा करून समस्या मार्गी लावणार असल्याचे आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी सुतारवाडी कोलाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिले. खासदार सुनील तटकरे यांनी मंडणगड पंचायत समितीत एक महिन्यापूर्वी घेतलेल्या जनता दरबारात उपस्थित समस्यांवर प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलते होते. पत्रकारांनी विचारलेल्या समस्यांवर संबंधित विविध यंत्रणेच्या सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांशी फोनद्वारे बोलून तातडीने प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना खासदार तटकरे यांनी दिल्या. आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम गतीने व्हावे यासाठी केंद्रीय बांधकाममंत्री नितीन गडकरी व राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी थेट संपर्क साधून नियोजित वेळेत रस्त्याचे काम पूर्ण करणार असल्याचे तटकरे यांनी आश्वस्त केले.

मंडणगड बसस्थानकाच्या आवारात सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या निर्मितीसाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा करून महामंडळाने येथे सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या निर्मितीसाठी काम हाती घ्यावे व त्यासाठी आवश्यकता भासल्यास खासदार निधीतून फंड उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सागरी महामार्गावरील बाणकोट बागमांडला पुलाचे काम सुरू झाले असून त्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबीची तयारी अंतिम टप्यात असल्याचे तटको यांनी सांगितले. याचबरोबर सावित्री नदीवर म्हाप्रळ-बित या दोन गालांना जोडणारा जुना पूल जीर्ण झाल्याने नवीन पूल शासनाकडे प्रस्तावित केला आहे. त्यासाठी निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मंडणगड तालुक्याचा पर्यटन विकास कशा पद्धतीने व्हावा यासाठी तालुकावासीयांच्या मार्गदर्शक व कुतीत आणता येणे शक्य असतील अशा सूचनांचे स्वागत असल्याचे सुचित केले.

RELATED ARTICLES

Most Popular