26.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता...

लांजा विकास आराखडा रद्द होणार नाही – आमदार किरण सामंत

लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची...

सीआरपी महिलांचे रत्नागिरीत धरणे आंदोलन

महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित लोकसंचालित साधनकेंद्रातील...
HomeRatnagiriअमली पदार्थाविरोधात तीन महिने व्यापक मोहीम - मंत्री उदय सामंत

अमली पदार्थाविरोधात तीन महिने व्यापक मोहीम – मंत्री उदय सामंत

अमली पदार्थ वितरकाच्या संपर्कात असणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करा.

जिल्ह्यातील तरुण अमली पदार्थांच्या विळख्यात सापडत आहेत. गेल्या पंचवीस वर्षांमध्ये या विरोधात ठोस पावले उचलण्याची वेळ आता आली आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये अमली पदार्थाविरोधी कोणतीही तडजोड न करता कठोर आणि प्रभावी मोहीम राबवून जिल्ह्यातून अमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करावे. अमली पदार्थ वितरकाच्या संपर्कात असणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करा. यामध्ये राजकीय पुढाऱ्याने हस्तक्षेपासाठी फोन केल्यास त्याच्या नावाचा पोलिस डायरीमध्ये उल्लेख करा; परंतु राज्यात जिल्हा अमली पदार्थमुक्त’ करण्याचा मान जिल्हा पोलिस दलाने मिळवावा, अशा सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्या, जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अंमली पदार्थविरोधी कार्यवाही, नियंत्रण व जनजागृतीबाबत औज आढावा बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, यादव यांच्यासह प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत म्हणाले, अमली पदार्थाचा थेट परिणाम युवापिढीवर होत आहे. हे प्रत्येक गावाचे दुःख आहे. ग्रामीण भागातील युवक मृत्युमुखी पडत आहेत. पोलिस चांगले काम करत असले तरी या सामाजिक मोहिमेत माध्यमांनीही त्यांना सहकार्य करावे. अमली पदार्थांबाबत वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करावी. कोणत्याही विशिष्ट धर्माचे वा जातीचे गुन्हेगार यात दिसून येत नाहीत. आरोपींची यादी पाहिली असता सरसकट आहेत, हे दिसून येते. राज्यात अमली वृदार्थमुक्त आपला रत्नागिरी जिल्हा करू. अमली पदार्थमुक्त जिल्ह्याचा रत्नागिरी पॅटर्न राज्यात जाईल, अशा पद्धतीने ही मोहीम तीव्र राबवावी.

माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन – PST अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्याबरोबर विक्री करणाराही तेवढाच दोषी आहे. अमली पदार्थ विक्रेता आणि त्याचे सेवन करणारा या दोघांवरही सारखीच कारवाई होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनी, तरुणांनी अमली पदार्थाचे सेवन करू नये. त्याची विक्री करणारे तसेच स्वापर करणारे यांच्याविषयीची माहिती जर कोणाला असेल तर त्यांची नावे पोलिसांना कळवावीत. कळवणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातील, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular