26.4 C
Ratnagiri
Wednesday, August 6, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeSportsआगामी टी-२० वर्ल्ड कपची धोनीवर मोठी जबाबदारी

आगामी टी-२० वर्ल्ड कपची धोनीवर मोठी जबाबदारी

धोनीने विश्वचषकासाठी १५ जणांची टीम निवडण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

बीसीसीआयने UAE आणि ओमानमध्ये होणाऱ्या आगामी २०२१ टी-२० विश्वचषकासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. याशिवाय बीसीसीआयने तीन राखीव खेळाडूंची देखील निवड केली आहे, जे संपूर्ण सामना टीम इंडियासोबत जातील. यासोबतच बीसीसीआयने माजी कर्णधार महेंद्रसिह धोनीवर वर्ल्डकपची मोठी जबाबदारी दिली आहे. बीसीसीआयने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची २०२१ टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या मार्गदर्शक पदी नियुक्ती केली आहे. असे मानले जाते की धोनीने विश्वचषकासाठी १५ जणांची टीम निवडण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

दरम्यान, भारतीय संघ आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना २४ अफगाणिस्तान आणि ५ नोव्हेंबर रोजी सुपर १२ मध्ये पात्रता संघ यांच्याशी सामना करेल. या १५ जणांच्या यादीमध्ये शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांना देखील विश्वचषक संघात स्थान मिळालेले नाही मात्र, अय्यरला राखीव खेळाडूमध्ये ठेवण्यात आले आहे. याशिवाय आश्चर्य म्हणजे. यूएईच्या खेळपट्ट्या लक्षात घेऊन बीसीसीआयने फिरकी गोलंदाज आणि फिरकी अष्टपैलूंविशेष ना महत्त्व दिले आहे. त्यामुळे वर्ल्ड कप संघात अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचा समावेश करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular