31.3 C
Ratnagiri
Wednesday, April 30, 2025

जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण पावसाची शक्यता

गेली दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते....

‘अणुस्कुरा’साठी आराखडा तयार करा – प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन

रत्नागिरी जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा 'शॉर्टकट' मार्ग...

शास्त्रीपुलाजवळील धोकादायक दरड कोसळली – रिक्षाचे नुकसान

संगमेश्वरनजीकच्या शास्त्रीपूल येथील धोकादायक दरड शनिवारी सकाळी...
HomeRatnagiriअनधिकृत गाड्यांबाबत अधिकाऱ्यांवर कारवाई करू - नीतेश राणे

अनधिकृत गाड्यांबाबत अधिकाऱ्यांवर कारवाई करू – नीतेश राणे

जेटीवर गाड्या पार्किंग केल्याने दोन गटांत मोठा राडा झाला होता.

बंदर खात्याच्या जागेवर कोणी अनधिकृतपणे गाड्या उभ्या केल्या, तर त्या समुद्रात लोटायला मी स्वतः इथे येईन. शासनाच्या जागेचा वापर शासकीय कामाकरताच झाला पाहिजे, त्यात अधिकाऱ्यांकडूनही कसूर झाल्यास त्यांच्यावरच थेट कारवाई केली जाईल, अशा शब्दांत मत्स्य व्यवसाय व बंदरविकासमंत्री नीतेश राणे यांनी अडखळ जेटीवर दोन गटांमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांना खडे बोल सुनावले. दापोली दौऱ्यावर असणाऱ्या राणे यांनी अडखळ बंदराला भेट देऊन जेटीच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी बंदर जेटीचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराची कानउघाडणी केली. ‘मला खोटी माहिती देऊ नको, खोटी माहिती द्याल, तर डबल फाईने करेन’, असा दम त्यांनी भरला. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी जेटीवर गाड्या पार्किंग केल्याने दोन गटांत मोठा राडा झाला होता.

या ठिकाणी गाड्यांना पार्किंगकरिता परवानगी कोणी दिली ? ही बंदर विकासखात्याची अंतर्गत जागो आहे. यावरून त्यांनी बंदरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. तुम्ही याकडे लक्ष’ दिले नाहीत, तर तुम्हाला घरात पाठवावे लागेल, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. यापुढे या बंदर किनाऱ्यावर अवैधरीत्या कोणी गाड्या पार्किंग केल्यास मी स्वतः येऊन या गाड्या सगळ्या समुद्रात लोटून टाकीन आणि यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असाही इशारा दिला. कार्यकर्त्यांनी योग्य माहिती माझ्यापर्यंत द्यावी, त्यानुसार कारवाई करता येईल, असेही स्पष्ट केले.

कार्यकर्त्यांना थांबवले – दापोली दौऱ्यावर आलेले भाजपचे युवानेते बंदरविकासमंत्री नीतेश राणे यांनी अडखळ जेटीची पाहणी करताना घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांनाही ‘थांबा, मी या ठिकाणी कोणतीही हवा भरायला आलेलो नाही. मी माझ्या खात्याच्या अधिकाऱ्यांजवळ बोलत आहे’, असे सांगितले.

हर्णे बंदर जेटीच्या कामाची पाहणी – रत्नागिरी जिल्ह्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हर्णे बंदर जेटीच्या कामाची पाहणी केली व हे काम वेळेत पूर्ण करण्याच्या व दर्जेदार करण्याच्या सूचना यावेळी राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. हर्णे बंदराच्या जेटीला मार्चला पर्यावरणखात्याची मंजुरी मिळाली आहे. २०५.२६ कोटी रुपयांचे हे काम आहे. महाराष्ट्राच्या बंदर मंत्रालयाच्या माध्यमातून हे काम वेळेत व्हावं, दर्जेदार व्हावे, आमच्या स्थानिक मच्छीमारांना रोजगार मिळावा याचा फायदा स्थानिकांनाच होणार आहे. त्यामुळे त्यांना विश्वासात घेतले जावे, यादृष्टीने काम केले जाणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular