26.1 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeDapoliटॉवर गावाला अन् रेंज नाही नावाला, दापोलीतील ओणनवसे गावाची व्यथा

टॉवर गावाला अन् रेंज नाही नावाला, दापोलीतील ओणनवसे गावाची व्यथा

ऑनलाईन कामावर त्याचा खुपच मोठा परिणाम होत आहे.

ओणनवसे गावात बीएसएनएल कंपनीने मोबाईल टॉवर उभा करून ६ महीने झाले. मात्र अद्यापही उभारलेला टॉवर सुरू करण्यात आलेला नाही त्यामुळे ‘टॉवर गावाला अन् रेंज नाही नावाला… ‘अशी अवस्था ओणनवसे गावासह परिसरातील गावांमधील म ोबाईलधारक ग्राहकांची झाली आहे. सध्यस्थितीत मोबाईल फोनचा वापर खुपच वाढला आहे. मात्र अजूनही ग्रामीण भागात म्हणावे तशी नेटकनेक्टीव्हिटी मिळत नसल्याने संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. नेटकनेक्टीव्हिटी अभावी बँका, पोस्ट पतसंस्था सारख्या वित्तसंस्था तसेच सरकारमान्य रास्त दराच्या दुकानातील धान्याची उचल असेल जमिनीचा सातबारा, आठ अ उतारा काढणे असेल अशा ऑनलाईन कामावर त्याचा खुपच मोठा परिणाम होत आहे.

आपल्यापासून दुर असलेल्या नातेवाईकांना संपर्क साधणे असेल वा शैक्षणिक माहिती, व्यवसायिक माहिती, शेअर्स बाजारातील चढ उतार तसेच प्रवासाची तिकीट बुकिंग असेल वा व्यवसाय असेल नाही तर ऑनलाईन खरेदी असेल अशा कितीतरी गोष्टी या आपल्याला घरबसल्या मोबाईल व्दारे करता येतात. सध्या जगणंच मुळी इंटरनेट शिवाय शक्य नाही अशी सर्वांचीच परिस्थिती झाली आहे. त्यामुळे फोनला रेंज मिळावी विविध प्रकारची कामे घरबसल्या ऑनलाईन करता यावीत यासाठी गावकरी नेटकनेक्टीव्हिटी करिता मोबाईल टॉवरची मागणी करतात त्यात काहींना यश येते. तर काहींची या ना त्या कारणाने कामे रखडतात. अशाच प्रकारे ओणनवसे परिसरातील नागरिकांनी मोबाईल टॉवरची मागणी कित्येक वर्षे सबंधित आस्थापनेकडे लावून धरली होती. त्याला वर्षभरापूर्वी यश आले. आणि दापोली तालुक्यातील ओणनवसे येथे बी. एस. एन. एल. चा टॉवर उभा राहिला लोकांनी समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES

Most Popular