शिवसेना उबाठा पक्षाचे नेते, सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत रविवार ४ मे रोजी लांजा यथे येत आहेत. लांजा नगरपंचायत डीपी प्लॅन आणि डंपिंग ग्राउंड यांना नागरीकांतून होत असलेला विरोध या विषयावर राऊत कोणते भाष्य करतात याकडे शहरातील नागरींकाचे लक्ष वेधले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या निमित्ताने होणाऱ्या छोटेखानी सभेत कार्यकर्ते यांना राऊत संबोधित करणार आहेत. यावेळी लांजा नगरपंचायतिने जाहीर केलेला प्रारुप विकास आराखडा, तसेच डंपिंग ग्राउंड यांना नागरिकांमधून प्रचंड विरोध केला जात असल्याने हे विषय सध्या ऐरणीवर आले आहेत. त्यामुळे याबाबत ठाकरे गटाचे शिवसेना पक्षाचे वतिने माजी खासदार कोणती भुमिका मांडतात याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे.
पक्षाच्या कार्यालयाच्या उद्धघाटनाला पक्षाचे सचिव सुधीर साळवी, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर, माजी आमदार गणपत कदम, रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, जिल्हा समन्वयक व उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, जिल्हा संघटक संतोष थेराडे, लोकसभा महिला संघटक सौ नेहा माने, लोकसभा सहसंपर्कप्रमुख गीतेश राऊत, ओबीसी सेल जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग उपळकर, तसेच राजापूर संपर्कप्रमुख चंद्रकांत चंद्रप्रकाश नकाशे, संपर्क प्रमुख चिपळूण विधानसभा सुरेश सुरेश कदम, महिला जिल्हा संघटक वेदा फडके, विधानसभा क्षेत्र प्रमुख अशोक संक्रे, विधानसभा संघटक रामचंद्र तथा तात्या सरवणकर, जिल्हा संघटक शिव सहकार चंद्रकांत शिंदे, युवा नेते अजित यशवंतराव, उपजिल्हा महिला संघटक सौ. उल्का विश्वासराव, लांजा तालुका संपर्कप्रमुख जगदीश जुलूम हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.