25.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriजिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध

जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध

९१ कर्मचाऱ्यांना एकाच विभागात १० वर्षांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाला आहे.

जिल्हा परिषद व पंचायत झालेल्या अधिकारी, कर्मचान्यांना समितीत विहित कार्यकाल पूर्ण मे महिना आला की, बदल्यांचे वेध लागत असतात. रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती जिल्हास्तरावर कार्यकाल संपलेल्या जिल्हा परिषद अधिकऱ्यांकडूनही सोयीस्कर बदली मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्यांचीही माहिती घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू होते, ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांची प्रक्रिया राबवण्यासाठी पारदर्शकपणे प्रशासनाचा प्रयत्न आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून वारंवार आढावा घेण्यात येत आहे. बदल्यांच्या प्रक्रियेत कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून बारकाईने लक्ष दिले जात आहे. प्रशासनाकडून सर्व विभागातील बदलीप्राप्त कर्मचाऱ्यांची माहिती घेण्याचे काम पूर्ण झाले आहे.

सध्या जिल्हा परिषदेच्या ९१ कर्मचाऱ्यांना एकाच विभागात १० वर्षांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाला आहे. त्यांच्या आता बदल्या होणार आहेत तर १०५ जणांनी विनंती बदल्यांसाठी अर्ज केला आहे. त्यासाठी समुपदेशन प्रक्रिया जिल्हा परिषद भवनात होणार आहे. बदलीसाठी फिल्डिंग एकाच विभागात एकाच टेबलावर १० वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता दुसऱ्या विभागात जावे लागणार आहे. यातील अनेक कर्मचाऱ्यांना मुख्यालयाबाहेरसुद्धा म्हणजे ९ पंचायत समितींमध्ये जावे लागणार आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावली जात असल्याची चर्चा आहे; परंतु ऑनलाईन बदली प्रक्रिया असल्याने प्रशासनाचीसुद्धा यावर करडी नजर असणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular