27.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...

आंजर्ले किनाऱ्यावर प्लास्टिकसह काळपट द्रव…

दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाकरिता परंपरेप्रमाणे ग्रामस्थ आंजर्ले...

‘एमआयडीसी हद्दपार’चे झळकले फलक, वाटदवासीयांचे गणरायाला साकडे

एमआयडीसी हद्दपार करा, असे फलक वाटद पंचक्रोशीतील...
HomeChiplunवाशिष्ठीतील गाळासाठी ७० जणांचे अर्ज - स्वखर्चाने वाहतूक

वाशिष्ठीतील गाळासाठी ७० जणांचे अर्ज – स्वखर्चाने वाहतूक

गरजूंना त्यांच्या मागणीनुसार गाळ वाटप करण्यात आला.

चिपळूण शहरांमध्ये पुराचे पाणी भरते त्याला वाशिष्ठी नदीतील गाळ कारणीभूत असल्याचा आरोप नेहमी केला जातो. त्यामुळे २०२१ च्या महापुरापासून दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू होते. वाशिष्ठी नदीत गाळ उपसा केल्यास, नदीतील पाण्याच्या प्रवाहासाठी मदत होते आणि पूर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. गाळ उपसा केल्याने नदीच्या पात्राला खोली वाढते आणि त्यामुळे पाणी जास्त साठवू शकते, ज्यामुळे पूर येण्याची शक्यता कमी होते. चिपळूण येथील वाशिष्ठी नदीत नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गाळ उपसा करण्यात आला आहे. वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा करणे आवश्यक आहे, उपसलेल्या गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. जेणेकरून नदीतील गाळ पुन्हा साचणार नाही आणि नदीचा प्रवाह कायम राहील.

दरवर्षी नदीतून गाळ काढला जातो. मागील दोन वर्ष नदीतून काढण्यात आलेला गाळ शहरातील शासनाच्या मोकळ्या जागेत टाकण्यात आला. त्यानंतर गाळ काढण्यासाठी ज्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला अशा जमीन मालकांच्या पाणथळ जागेत गाळ टाकून त्या जागेत भराव करण्यात आला. त्यानंतर गरजूंना त्यांच्या मागणीनुसार गाळ वाटप करण्यात आला. वाशिष्ठीतील गाळ देताना शासन नागरिकांकडून कोणतीही रॉयल्टी घेत नाही. ज्या ठिकाणी गाळ करण्याचे काम सुरू आहे तेथून नागरिकांनी स्वखर्चाने गाळ देण्याची मुभा शासनाने केली आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत चिपळूणला आले होते. त्यांनी गाळ काढण्याच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर प्रशासनाला सूचना करताना नागरिकांना मोफत गाळ देण्याचे आदेश दिले. त्यानुसार तहसीलदारांनी नागरिकांना मोफत गाळ घेऊन जाण्याचे आवाहन केले गाळ आहे.

RELATED ARTICLES

Most Popular