27.9 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeMaharashtraराजाचा दरबार, कायम चर्चेत

राजाचा दरबार, कायम चर्चेत

नवसाला पावणारा बाप्पा म्हणून ख्याती असलेला लालबागचा राजा मंडळ दिवसेंदिवस वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे.

नवसाला पावणारा बाप्पा म्हणून ख्याती असलेला लालबागचा राजा मंडळ दिवसेंदिवस वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात सर्व राज्यातून अनेक जण राजाच्या दर्शनासाठी येत असतात. कायम भक्तांच्या गर्दीने खचाखच भरलेला असतो राजाचा मंडप. पण चांगल्या गोष्टीला कुठे न कुठे तरी गालबोट हे लागतच असत. कधी कार्यकर्त्यांची दादागिरी पहायला मिळते तर काही वेळा पोलिसांची अरेरावी या परिसरामध्ये कायमच पाहायला मिळते.

काल तर पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी तर एखाद्या गुंडाप्रमाणे पत्रकारांवर अरेरावी केलेली पाहण्यात आली आहे. स्वत: मास्क न वापरता, संजय निकम यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली आहे. मीडियाकर्मींनी पोलीस निरीक्षक संजय निकम यांना प्रेमाने, समजुतीने बोलण्यासं सांगितलं, त्यावेळी त्यांचा पारा आणखीनच चढला आणि त्यांनी धक्काबुक्की केली. पत्रकारांनी संजय निकम यांना आम्हाला हात लावू नका असं बजावलं. त्यावेळी या अधिकाऱ्याने हात काय पाय सुद्धा लावून दाखवतो थांब अशी गुंडगिरीची भाषा वापरली.

पोलिसांच्या या असभ्य वर्तनामुळे, जर कायदा राखणाऱ्यांनीच अरेरावी केली तर विचारायचं कुणाला हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. याप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आम्ही निषेध करतो,  झाल्या प्रकाराची चौकशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी करावी,  मुख्यमंत्र्यांनी स्वत: यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी केली आहे. माध्यमं आपलं काम करत होते. जास्त गर्दी नव्हती. त्यांच्याकडे पासेस होते. अशावेळी त्यांना मारहाण, धक्काबुक्की करणं योग्य नाही.

मागील दोन वर्षांपासून  माध्यमांवर दबाव निर्माण करण्याचं प्रकार सुरु आहेत. हि पद्धत योग्य नव्हे, याची दखल सरकारने घेणे गरजेचे आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील दरेकरांना पाठिंबा दर्शवत, त्वरित कारवाई हि झालीच पाहिजे, पण अशाप्रकारे दंडुकेशाहीच्या जोरावर जर आपण कायदा आणि सुव्यवस्थेच्या गप्पा मारत असू तर ते काही योग्य नाही. झालेले हे अतिशय चुकीचं हे वर्तन आहे आणि याबाबत कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी केली आहे.

 

RELATED ARTICLES

Most Popular