27.9 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeChiplun'समर' स्पेशल विक्रमी गर्दीने धावत असल्याने कोकण मार्गावर चाकरमान्यांची लटकंती सुरुच

‘समर’ स्पेशल विक्रमी गर्दीने धावत असल्याने कोकण मार्गावर चाकरमान्यांची लटकंती सुरुच

कोकण मार्गावर रेल्वेगाड्या नियमित फुल्ल धावतात.

उन्हाळी सुट्टी हंगामासह लग्नसराई अन् ग्रामदेवतांच्या उत्सवांमुळे चाकरमानी गावी डेरे दाखल होत आहेत. यामुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह समर स्पेशल विक्रमी गर्दीन धावत आहेत. रेल्वेगाड्यांच्या ‘रिग्रेट’ मुळे चाकरमान्यांचा हिरमोड होत आहे. तोबा गर्दीमुळे चाकरमान्यांचा लटकंतीचा प्रवास सुरू आहे. तरीही रेल्वे प्रशासनाने गाड्यांना अद्यापही अतिरिक्त डबे जोडण्याची तसदी घेतली नसल्याने चाकरमान्यांचे हाल सुरूच आहेत. कोकणातील सणांपाठोपाठ उन्हाळी सुट्टीच्या हंगामात सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या सर्वाधिक असते. मे महिन्यात लग्नसराईसह ग्रामदेवतांचे उत्सव, जत्रोत्सव, त्रैवार्षिक गोंधळ यासारख्या धार्मिक कार्यक्रमांनाही चाकरमानी आवर्जून हजेरी लावतात. यामुळे उन्हाळी सुट्टी हंगामातील नियमित गाड्यांसह उन्हाळी स्पेशल गाड्यांचे आरक्षण यापूर्वीच फूल झाले आहे. सद्यस्थितीत आरक्षित तिकिटांऐवजी ‘रिग्रेट’चाच शेरा पडत आहे.

कोकण मार्गावर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाळी स्पेशल धावत आहे. एलटीटी-करमाळी, एलटीटी-मडगाव, एलटीटी-तिरुवअनंतपुरम, मंगळूर, उधना-सीएसएमटी-करमाळीसह वास्को द गामा-मुजफ्फपूर साप्ताहिक उन्हाळी स्पेशल धावत आहे. या सर्वच स्पेशल विक्रमी गर्दीतच धावत आहेत. प्रवाशांना आरक्षित तिकिटे मिळेनाशी झाली आहेत. तरीही रेल्वे प्रशासन जादा गाड्या चालवण्यास स्वारस्य दाखवत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एरव्ही गर्दीच्या हंगामात रेल्वे प्रशासन रेल्वेगाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा सपाटा सुरू ठेवत चाकरमान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत असते. उन्हाळी सुट्टी हंगामात रेल्वेगाड्या हाऊसफ ल्ल धावत असतानाही रेल्वे प्रशासन गाड्यांना अतिरिक्त डबे जोडून गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी पुढाकार का घेत नाही, अशी विचारणा चाकरम ान्यांकडून केली जात आहे.

कोकण मार्गावर रेल्वेगाड्या नियमित फुल्ल धावतात. गर्दीच्या विभाजनाची मुंबई-रत्नागिरी अथवा मुंबई-चिपळूण जादा गाडी नियमितपणे चालवण्यासाठी कोकण विकास समितीसह अन्य प्रवासी संघटनांचा सतत तगादा सुरू आहे. मांत्र रेल्वे प्रशासन दाद देत नसल्याने प्रवाशांचा लटकंतीचा प्रवास सुरु आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सकारांत्मक प्रतिसाद देण्याचा आग्रहही धरण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular