28.6 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeChiplunचिपळुणात एकाच रात्रीत नऊ सदनिका फोडल्या

चिपळुणात एकाच रात्रीत नऊ सदनिका फोडल्या

सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या तीन दिवसांपासून येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फायदा उठवत शहरातील राधाकृष्णनगर परिसरातील नऊ सदनिका चोरट्याने फोडल्या. गुरुवारी (ता. २२) रात्री या घरफोड्या करण्यात आल्या. वर्षभरातील ही सर्वांत मोठी घरफोडीची घटना असून, या घटनेमुळे येथील पोलिस यंत्रणेची झोप उडाली आहे. बंद स्थितीत असलेल्या सदनिका फोडल्या असल्या तरी त्यातील तीन सदनिकांमधूनच मुद्देमाल चोरीला गेला आहे. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस तातडीने कामाला लागली आहे. काही महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असल्याची माहिती मिळत आहे. महिनाभरापूर्वी बाजारपेठेतील कोकण बाजार व अन्य दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनेचा तपास अद्याप सुरू आहे. त्यातील चोरट्यांचे फुटेज पोलिसांच्या हाती मिळाले होते. त्यानुसार अजूनही त्यांचा शोध घेतला जात आहे; मात्र त्यानंतर शहरातील चोरीच्या घटना थांबल्या होत्या. गेले तीन दिवस जोरदार पाऊस सुरू आहे. त्याशिवाय शहरातील अनेक कुटुंबे उन्हाळी सुटीच्या निमित्ताने परगावी गेली आहेत. त्याचा फायदा उठवत चोरट्यांनी पुन्हा एकदा चोरीचे सत्र सुरू केले आहे.

शहरातील राधाकृष्णनगर परिसरातील ९ सदनिका चोरट्यांनी फोडल्या. त्यात राधाकृष्णनगर येथील सोहम अपार्टमेंटमधील दोन सदनिका, ‘श्रावणधारा’मधील पाच, ‘साईविहार’मधील एक व ‘गुरुकृपा’मधील एका सदनिकेचा समावेश आहे. यातील लोंढे यांच्या सदनिकेमधील दागिने व अन्य मुद्देमाल चोरीला गेला असून, याबाबत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती. तसेच धर्मे व नायर यांच्या सदनिकेतूनही मुद्देमाल चोरीला गेला असून, ते कराड व केरळ येथे गेल्याने अद्याप त्याबाबत कोणतीही तक्रार दिलेली नाही. या व्यतिरिक्त अन्य घरफोड्या झाल्या असल्या तरी तेथून फारसे काही चोरीला गेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने व पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. या चोरीच्या तपासासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूकही केली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना तातडीने पाचारण करण्यात आले होते. त्याप्रमाणे पोलिस पुढील तपास करत आहेत.

चोरट्यांची चार दिवसांपासून रेकी – या चोरीप्रकरणी संशयित असलेल्या दोन चोरट्यांचे काही महत्त्वाचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. अंगात रेनकोट असल्याने त्यांचे चेहरे अस्पष्ट दिसत असले तरी त्यांच्या हालचाली टिपण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच संबंधित चोरटे तीन-चार दिवसांपासून या परिसरात रेकी करत असल्याची माहितीदेखील स्थानिकांमधून सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular