26.6 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeChiplunपावसात एसटीचे वेळापत्रक कोलमडले, अपुऱ्या फेऱ्यांमुळे गैरसोय

पावसात एसटीचे वेळापत्रक कोलमडले, अपुऱ्या फेऱ्यांमुळे गैरसोय

प्रवाशांना तब्बल एक ते दीड तास एसटीची वाट पाहावी लागत आहे.

चिपळूण-रत्नागिरी मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. तब्बल एक ते दीड तास एसटी बसची वाट पाहावी लागते. त्यामुळे प्रवाशांचा संताप वाढला आहे. आगारप्रमुख, विभाग नियंत्रकांनी आणि विशेषतः लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशीच मागणी प्रवासी करत आहेत. एसटी महामंडळाची लाडकी लालपरी ही शहराबरोबरच ग्रामीण भागातील प्रवाशांची वरदायिनी मानली जाते. याच एसटी बसमधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळे सरकारच्या वतीने दिलेल्या सवलतीमुळे एसटीत प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यामुळे एसटी बसेसची संख्या कमी पडत आहे. चिपळूणमध्ये १०५ बस आहेत. यातील काही जुन्या आहेत. नव्या दहा बसची आगारातून मागणी करण्यात आली आहे. त्या अजून उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात एसटीचे वेळापत्रकच कोलमडले आहे.

प्रवाशांना तब्बल एक ते दीड तास एसटीची वाट पाहावी लागत आहे. काहींना भिजतच उभे राहावे लागत आहे, पाऊस वाढल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. कित्येक वर्षापासून बसस्थानकाचे काम सुरू आहे. त्यातच महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे चिपळूण ते रत्नागिरीदरम्यानचे रस्ते चिखलमय, जलमय झाले आहे. त्यामुळे एसटी ठरलेल्या ठिकाणी जाण्यासाठी तीन ते साडेतीन तास लागतात. प्रवासी नाईलाजास्तव खासगी वडापचा आधार घेऊन आपल्या गावी, तालुक्याला जात आहेत. ऑफिसला जाण्यावेळी ८ ते १० या वेळेत व सायंकाळी ५ ते ८ यां वेळेत एसटी बस वेळेत सुटणे गरजेचे आहे. या वेळेत खासगी बस सुटतात; मात्र प्रवाशांना एसटीची वाट पाहावी लागते. चिपळूण आगारातून रत्नागिरी-गुहागर-खेड मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या फेऱ्यांना विलंब होतो. त्यामुळे या मार्गावर दैनंदिन प्रवास करणाऱ्या नोकरदारवर्गांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

RELATED ARTICLES

Most Popular