26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeMaharashtraप्रतीबाळूमामा बनलेले मनोहर भोसले अखेर पोलिसांच्या ताब्यात, साताऱ्यात अटक

प्रतीबाळूमामा बनलेले मनोहर भोसले अखेर पोलिसांच्या ताब्यात, साताऱ्यात अटक

गुरुवारी प्रतीबाळूमामा बनलेले मनोहर भोसले यांच्या विरोधात करमाळ्यात एका महिलेने बलात्काराची फिर्याद दाखल केली.

सध्याच्या युगात कोणी किती कोणावरती विश्वास ठेवायचा यासाठी जागरूक असणे गरजेचे आहे. काही लोक अध्यात्माचा गैरवापर करून, भोळ्या भाबड्या लोकांना फसवतात. आणि त्यांच्या कडून अवाजवी पैशाची मागणी करून लुबाडतात. कोणत्या तरी संकटाने हतबल झालेला व्यक्ती अशा भूलथापाना बळी पडतात आणि आपलेच आर्थिक नुकसान करून घेतात.

बाळूमामा हे शंकरांचे अवतार मानले जात असून, अनेक त्यांचे भक्तगण सर्वत्र भारतभर आहेत.परंतु,  बाळूमामाचा अवतार असल्याचे भासवत बारामतीतील युवकाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या मनोहरमामा भोसले वय ३९, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर याला मिळालेल्या खबरीनुसार, पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांनी सातार्‍यातून ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, बारामतीतील शशिकांत सुभाष खरात याच्या वडिलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा भासवत फिर्यादीच्या वडिलांच्या गळ्यातील थायराईड कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला.  विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडिलांच्या व फिर्यादीच्या जीविताची भीती घालून फिर्यादीकडून एकूण २ लाख ५१ हजार रुपये उकळले आणि त्यांची फसवणूक केली. त्यात पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी देखील फिर्यादीला दिली होती.

दरम्यान, गुरुवारी प्रतीबाळूमामा बनलेले मनोहर भोसले यांच्या विरोधात करमाळ्यात एका महिलेने बलात्काराची फिर्याद दाखल केली. यानंतर मात्र हे प्रतीबाळूमामा  बनलेले मनोहर भोसले हे फरारी झाले. पोलीस त्यांच्या मागावरच असल्याने, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तो सातार्‍यात असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांनी सातार्‍यातून अटक केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular