26.7 C
Ratnagiri
Wednesday, July 30, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeRatnagiriरत्नागिरीत वाटद गावात उभा राहाणार स्फोटके, दारुगोळा, शस्त्रांचा कारखाना

रत्नागिरीत वाटद गावात उभा राहाणार स्फोटके, दारुगोळा, शस्त्रांचा कारखाना

रिलायन्स डिफेन्स लिमिटेड ही रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरसबसिडरी कंपनी आहे.

भारतीय उद्योगपती अनिल अंबानी आपला महाप्रकल्प कोकणात सुरु करणार आहेत. भारतातील महाप्रकल्प महाराष्ट्रात सुरु करण्यात येणार आहे. लायन्स डिफेन्स लिमिटेड रत्नागिरीमध्ये वाटद गावात स्फोटके, दारुगोळा आणि लहान शस्त्रे तयार करणारा प्लांट उभारणार आहे. संरक्षण क्षेत्रातील हा सर्वात मोठा नवीन प्रकल्प मानला जात आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने आर्थिक वर्ष २०२७ च्या अखेरीस १५५ मिमी दारूगोळा आणि अॅग्रीगेट्सच्या निर्यातीतून ३००० कोटी रुपये कम विण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनी चालू आर्थिक वर्षातच १५०० कोटी रुपयांच्या मोठ्या कॅलिबर दारूगोळा निर्यात करण्याचा अंदाज व्यक्त करत आहे. अहवालानुसार, कंपनीने आतापर्यंत १०० कोटी रुपयांचे तोफखाना दारूगोळा आणि संबंधित उपकरणे निर्यात केली आहेत. या प्रकरणाशी परिचित सूत्रांचे म्हणणे आहे की रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे भारतातील टॉप ३३ संरक्षण निर्यात करणाऱ्या कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट आहे.

कंपनीचे मुख्य लक्ष युरोपियन युनियन बाजारपेठेवर आहे, जिथे तोफखाना दारूगोळा साठ्याची मोठी मागणी आहे. अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने महाराष्ट्रात सुरु करण्यात येणाऱ्या डिफेन्स प्रोजेक्टची घोषणा केली. रिलायन्स डिफेन्स लिमिटेड ही रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरसबसिडरी कंपनी आहे. रिलायन्स डिफेन्स लिमिटेड कंपनी कोकणात धीरुभाई अंबानी डिफेन्स सिटी उभारणार आहे. या प्रकल्पासाठी रत्नागिरीतील वाटड औद्योगिक परिसरात १००० एकर जम ीन देण्यात आली आहे. येथेच धीरुभाई अंबानी डिफेन्स सिटी मध्येच रिलायन्स डिफेन्स लिमिटेड कंपनी उभारली जाणार आहे. या कंपनीत स्फोटके, दारूगोळा आणि लहान शस्त्रे तयार केली जाणार आहेत. रिलायन्स डिफेन्स लिमिटेड कंपनीमार्फत दारुगोळा श्रेणीत लहान, मध्यम आणि मोठ्या कॅलिबर आणि टर्मिनली गायडेड म्यूनिशन यांची निर्मीती केली जाणार आहे.

स्मॉल आर्म्स पोर्टफोलिओमध्ये सिव्हिल आणि मिलिट्री एक्सपोर्ट मार्केटुर फोकस केला जाणार आहे. या डिफेन्स प्रोजेक्ट अंतर्गत पुढील १० वर्षात कंपनी १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पासाठी जगातील सहा आघाडीच्या संरक्षण कंपन्यांसह करार केला जाणार आहे. रिलायन्स डिफेन्स लिमिटेडला याआधीच सरकारकडून शस्त्रास्त्र निर्मीतीचा परवाना मिळाला आहे. रिलायन्सचा नागपूरच्या मिहानमध्ये फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशन आणि थेल्स या दोन आघाडीच्या संरक्षण कंपन्यांसोबत यशस्वी संयुक्त उपक्रम सुरू आहे. डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड (डीआरएएल) आणि थेल्स रिलायन्स डिफेन्स सिस्टीम (टीआयटीएस) या दोन कंपन्यांमार्फत शस्त्रसाम्रगीचे उत्पादन केले जाते.. उत्पादनातील १०० टक्के निर्यात केली जाते. या उपकंपनीद्वारे कंपनीने १००० कोटी रुपयांची संरक्षण उपकरणे निर्यात् केली आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular