25.9 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeIndiaबेरोजगार झालेल्या कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा दिलासा

बेरोजगार झालेल्या कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा दिलासा

या अटल बीमित कल्याण योजनेमार्फत नोकरी गमावणाऱ्या संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाच हा लाभ मिळतो.

कोरोना महामारीमुळे अनेक जणांना आपल्या नोकरी व्यवसाय बंद करावे लागले. मागील साधारण एक वर्ष सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने अनेक जन आर्थिक विवंचनेत असून, बेरोजगारीचा सामना त्यांना करावा लागत आहे.

कोरोना काळात अनेकांना नोकऱ्यांवर पाणी सोडावे लागले. काहींचे उत्तम स्थितीत चालणारे व्यवसाय उद्योग-धंदे ठप्प झाले. अनेकांवर उपासमारीची वेळ आली, कुटुंबाला पोसायचे कसे हा प्रश्न अनेकांसमोर आ वासून उभा राहिला आहे. मात्र,  मोदी सरकारने अशा बेरोजगार झालेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. अशा कर्मचाऱ्यांना सरकार तीन महिने बेरोजगारी भत्ता देणार आहे.

कर्मचारी राज्य विमा महामंडळातर्फे  अटल बीमा व्यक्ती कल्याण योजनेंतर्गंत औद्योगिक कामगारांना असा बेरोजगारी भत्ता दिला जातो. कोरोना काळात नोकरी गमावलेल्या कामगारांना आर्थिक मदत म्हणून  या योजनेचा कालावधी सुद्धा वाढविण्यात आला आहे.  या योजनेची मुदत यावर्षी ३० जून रोजी समाप्त झाली होती, मात्र  सरकारने आता त्यास ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

कोरोना काळात आतापर्यंत ५०,००० हून अधिक लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. कोणत्याही कारणांमुळे नोकरी गमावल्यास ३ महिन्यांसाठी ५० टक्के पगारावर हा बेरोजगारी भत्ता दिला जातो. या अटल बीमित कल्याण योजनेमार्फत नोकरी गमावणाऱ्या संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाच हा लाभ मिळतो. जे कर्मचारी ESIC स्किम अंतर्गत कव्हर आहेत, म्हणजेच ESIC साठी योगदान म्हणून, ज्यांच्या मासिक पगारातून पैसे कापले जातात, अशा लोकांनाच सरकारकडून जास्तीत जास्त ९० दिवस ही मदत केली जाते.

RELATED ARTICLES

Most Popular