27.5 C
Ratnagiri
Wednesday, July 30, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeSportsगुकेश - कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस - नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

नॉर्वे स्पर्धेत अखेरच्या फेरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे.

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची चुरस दिसून येत आहे. भारताचा युवा विश्वविजेता खेळाडू डी. गुकेश व नॉर्वेचा महान खेळाडू मॅग्नस कार्लसन यांच्यामध्ये विजेतेपदासाठी रोमहर्षक लढत पाहायला मिळत आहे. नवव्या फेरीनंतर कार्लसन १५ गुणांसह पहिल्या स्थानावर असून, गुकेश १४.५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अव्वल दोन खेळाडूंमध्ये फक्त अर्ध्या गुणाचा फरक आहे. या स्पर्धेची एक फेरी बाकी आहे. डी. गुकेश याने नवव्या फेरीमध्ये चीनच्या वेई यी याच्यावर विजय मिळवला व तीन गुण वसूल केले. चीनच्या खेळाडूने ४०व्या चालीमध्ये हार मानली. या विजयानंतर गुकेश म्हणाला, नवव्या फेरीतील विजयानंतर आनंदी आहे. अखेरच्या फेरीतही सूर गवसायला हवा. दहाव्या फेरीकडे माझे लक्ष आहे. मॅग्नस कार्लसन याने फॅबियानो कारुआना याला पराभूत करीत तीन गुणांची कमाई केली.

अखेरच्या लढतींवर लक्ष – नॉर्वे स्पर्धेत अखेरच्या फेरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे. डी. गुकेशसमोर फॅबियानो कारुआना याचे आव्हान असणार आहे. मॅग्नस कार्लसन याला अर्जुन एरीगेसीशी दोन हात करावे लागणार आहेत. कार्लसन याने या लढतीत विजय मिळवल्यास त्याला सातव्यांदा ही स्पर्धा जिंकता येणार आहे. गुकेशला अखेरच्या लढतीत विजय हवा आहे. तसेच अर्जुन-कार्लसन यांच्यामधील लढतीतील निकाल मनाजोगता लागल्यास गुकेशला या स्पर्धेत पहिल्यांदाच विजेता होता येणार आहे.

कोनेरु हंपीला विजेतेपदाची संधी – भारताची अनुभवी खेळाडू कोनेरु हंपी हिच्याकडे महिला विभागात विजेतेपदाची संधी आहे. युक्रेनची खेळाडू अॅना मुझीचूक हिच्याकडे १५.५ गुण असून, ती पहिल्या स्थानावर आहे. हंपी हिच्याकडे १३.५ गुण असून, ती दुसऱ्या स्थानावर आहे. हंपीने अखेरच्या फेरीत जू वेनजुन हिला पराभूत केल्यास व आर. वैशाली हिने अॅना मुझीचूक हिला नमवल्यास हंपीला विजेती होता येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular