27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeKokanसिंधुदुर्गमध्ये मुंबई विद्यापीठ उपकेंद्राचा शुभारंभ

सिंधुदुर्गमध्ये मुंबई विद्यापीठ उपकेंद्राचा शुभारंभ

रत्नागिरीमधील मुंबई विद्यापीठ उपकेंद्राचे उद्घाटनाच्या वेळेला आमदार सामंत यांनी सिंधुदुर्ग मध्ये सुद्धा लवकरात लवकर उपकेंद्र सुरु करण्याचे सुतोवाच केले होते.ते एका अर्थाने खरे ठरले आहे.

रत्नागिरीमधील मुंबई विद्यापीठ उपकेंद्राचे उद्घाटनाच्या वेळेला आमदार सामंत यांनी सिंधुदुर्ग मध्ये सुद्धा लवकरात लवकर उपकेंद्र सुरु करण्याचे सुतोवाच केले होते. ते एका अर्थाने खरे ठरले आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज रविवारी मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्राचे उद्घाटन पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. ठाणे व रत्नागिरीनंतर विद्यापीठाचे सिंधुदुर्ग हे तिसरे उपकेंद्र आहे. मुंबई विद्यापीठाने गणेशोत्सव काळ सुरु असतानाचा आपल्या सिंधुदुर्ग उपकेंद्राचा देखील शुभारंभ केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग उपकेंद्राने पर्यावरण स्नेही परिसर अशी वेगळी ओळख निर्माण करावी व आदर्श शैक्षणिक परिसर होण्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केली.

उद्घाटन सोहळ्याला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर, प्र. कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, खासदार विनायक राउत, आमदार दीपक केसरकर, कुलसचिव बळीराम गायकवाड आदी उपस्थित होते. त्याचोरमाणे त्यांनी विशेष करून सांगितले कि, मंत्री उदय सामंत व कुलगुरू सुहास पेडणेकर हे दोघेही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांनी विद्यापीठातील तसेच देशविदेशातील तज्ञ व प्राध्यापकांना सिंधुदुर्ग परिसर येथे आमंत्रित करावे व तेथील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अत्याधुनिक उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्यास सहकार्य करावे.

कालांतराने सिंधुदुर्ग उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठ व्हावे या दृष्टीने देखील प्रयत्न झाले पाहिजे, अशीही अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. सिंधुदुर्ग येथे उपकेंद्राला सुरु होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना उपकेंद्राला प्रा. मधु दंडवते यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आल्यास त्यावर सकारात्मक विचार केला जाईल असे उदय सामंत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular