24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriमहिलेला १० लाख रुपयांना गंडा, जादा परताव्याचे आमिष

महिलेला १० लाख रुपयांना गंडा, जादा परताव्याचे आमिष

इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अॅपवर वर्कफ्रॉम होमची जाहिरात ठेवली होती.

सोशल मीडियावर वर्कफ्रॉम होमच्या नावाखाली गुंतवणुकीत जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत महिलेची तब्बल १० लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. ही घटना ८ मे २०२५ ला सकाळी ८.३० ते २७ मे २०२५ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या कालावधीत कुवारबाव परिसरात घडली. एक महिला (पूर्ण नाव माहीत नाही.) आणि प्रवीण (पूर्ण नाव माहीत नाही.) या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात रोहिणी मंदार गीते (वय ४५, रा. साईगण वृंदावन सोसायटी कुवारबाव, रत्नागिरी) यांनी शुक्रवारी ६ जूनला शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयितांनी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अॅपवर वर्कफ्रॉम होमची जाहिरात ठेवली होती.

या जाहिरातीच्या नावाखाली स्केचर्स कंपनीमध्ये कामासाठी फिर्यादीला टेलिग्राम अकाउंटवर माहिती देऊन सुरुवातीला फिर्यादीला कस्टम ऑर्डरसाठी भरलेल्या रकमेवर त्यांना योग्य परतावा देऊन असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीने आपल्या बँक खात्यातून १० लाख रुपये भरले होते; परंतु या रकमेचा कोणताही परतावा फिर्यादीला न देता त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम वारंवार मागूनही परत केली नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे गीते यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

वाढत्या घटना चिंताजनक – जिल्ह्यात दरदिवशी समाजमाध्यमांच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक होत असल्याच्या घटना घडत आहेत. झटपट पैसा मिळवण्याच्या आमिषाने रत्नागिरीकर पुन्हा फसताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वीच चिपळूणमध्ये ६ लाखांची ऑनलाईन फसवणूक केली. त्यापूर्वी आणखी काहींची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे प्रकार ताजे असतानाच सुशिक्षित लोकच जास्त फसताना दिसत आहेत. पोलिस, बँका आदींकडून सूचना, जनजागृती केली जाते तरी नागरिक फसत आहेत, ही चिंतेची बाब आहे.

RELATED ARTICLES

Most Popular