30.3 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...

यंदा परीक्षा लवकर होणार १० वी, १२ वीच्या तारखा जाहीर

एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे दहावी...

माजी मंत्री बच्चू कडूंचा निवडणूक आयोगासह ईव्हीएमवर हल्लाबोल

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू...
HomeSindhudurgहवसे, गवसे, नवसे खासदार झाले म्हणून चिपी विमानतळ उभारले नाही- निलेश राणे

हवसे, गवसे, नवसे खासदार झाले म्हणून चिपी विमानतळ उभारले नाही- निलेश राणे

नारायण राणेंसारखा माणूस केंद्रीय मंत्री झाला आणि नंतर चिपी विमानतळ आलं हे मला सांगायची गरज नाही,

सिंधुदुर्गमध्ये उद्घाटनाच्या आतुरतेमध्ये असेलेले बहुचर्चित चिपी विमानतळावरून अजूनही बारीक सारीक वाद विवाद सुरूच आहेत. उद्घाटनाची तारीख ठरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला यायलाच पाहिजे असं काही नाही, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वक्तव्य केले होते. त्यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना बोलावयची गरज आहे कि नाही हे सांगणारे तुम्ही कोण!  तुम्हाला कोणी अधिकार दिला आहे सांगायचा! जर तुम्हाला तेवढी माहिती नसेल, तर शिकून घ्या म्हटले होते.

आता पलटवार म्हणून नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. चिपी विमानतळावरुन माजी खास. निलेश राणे यांनी “कुणी हवसे, गवसे, नवसे खासदार झाले म्हणून विमानतळ होत नाही अशी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यासोबतच नारायण राणेंचे केंद्रामध्ये वेगळे वजन आहे, त्यांची एक वेगळी इमेज आहे आणि त्या सगळ्यामुळेच केवळ जिल्ह्याच्या विकास कामासाठी फायदा होतो आहे.

नारायण राणेंसारखा माणूस केंद्रीय मंत्री झाला आणि नंतर चिपी विमानतळ आलं हे मला सांगायची गरज नाही, आता “हवसे, गवसे, नवसे फक्त खासदार झाले म्हणून चिपी विमानतळ उभारले गेलेले नाही, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे. श्रेयावादावरून कितीहीनी वाद घातले तरी सुद्धा चिपी विमानतळाच्या बाबतचे सर्व निर्णय आणि आदेश कोणी मिळवून दिले हे सर्व ज्ञात आहे. त्यामुळे कोणीही कितीही आणि कशाही प्रकारे श्रेय लादण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही.

RELATED ARTICLES

Most Popular