27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriकोकण रेल्वे मार्गावर धावणारी वंदे भारत आता फक्त ३ दिवसच धावणार

कोकण रेल्वे मार्गावर धावणारी वंदे भारत आता फक्त ३ दिवसच धावणार

१५ जून ते २० ऑक्टोबर या कालावधीत म ान्सून वेळापत्रक लागू करण्यात आले आहे.

आताच्या घडीला भारतीय रेल्वेची सर्वांत लोकप्रिय ट्रेन म्हणजे ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस. देशातील अनेक मार्गावर या ट्रेनची सेवा सुरू आहे. प्रवाशांचा या ट्रेनला प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून काही मार्गावरील ‘वंदे भारत’ ट्रेनच्या डब्यांची संख्याही वाढवण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. परंतु, पावसाळ्यात कोकणासह गोव्याचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी जाण्याचा प्लान करत असलेल्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई ते गोवा या मार्गावरील ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द होत आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच सीएसएमटी स्थानकाहून गोव्यातील मडगाव स्थानकापर्यंत ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस नियमितपणे चालवली जाते. परंतु, आता कोकण रेल्वे म ार्गावरील मान्सून वेळापत्रकामुळे मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसच्या अप आणि डाऊन फेऱ्या कमी करण्यात येणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर १५ जून ते २० ऑक्टोबर या कालावधीत म ान्सून वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. या कालावधीत रेल्वेगाड्यांचा वेग मंदावतो.

बहुतांश रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल होतो. याचा सर्वाधिक फटका अतिजलद ट्रेनना बसतो. वंदे भारत एक्स्प्रेसलाही कोकण रेल्वेवरील मान्सून वेळापत्रकाचा फटका बसला आहे. आठवड्यातून ६ वेळा धावणारी वंदे भारत आता मान्सून वेळापत्रकानुसार फक्त ३ दिवस धावेल. कोकण रेल्वेच्या मान्सून वेळापत्रकामुळे जून ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबई ते गोवा वंदे भारतच्या शंभरहून अधिक फेऱ्या रद्द होतील. कोकणात जाणाऱ्यांची संख्या गणेशोत्सव काळात सर्वाधिक असते. तसेच पावसाळ्यात मुंबई ते गोवा दरम्यानचे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक वंदे भारतचा प्रवास निवडतात. धो-धो पाऊस पडत असताना, दृश्यमानता कमी होते. यासाठी लोको कोकण मार्गावरील ट्रेनच्या लोको पायलट यांनाही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

वंदे भारतचे वेळापत्रक – कोकण रेल्वेच्या मान्सून वेळापत्रकानुसार, जून ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबई ते गोवा मार्गावरील वंदे भारत ट्रेन आता आठवड्यातील ३ दिवस चालवली जाणार आहे. गाडी क्रमांक २२२२९ सीएसएमटी-मडगांव वंदे भारत एक्स्प्रेस दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पहाटे ५.२५ वाजता स्त्रीएसएमटीवरून सुटेल आणि मडगाव येथे दुपारी ३.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक २२२३० मडगाववरून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी १२.२० वाजता सुटेल आणि रात्री १०.२५ वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल.

RELATED ARTICLES

Most Popular