25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeMaharashtraमहिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल आणि थोबाड रंगवून दाखवू - रुपाली चाकणकरांचा इशारा

महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल आणि थोबाड रंगवून दाखवू – रुपाली चाकणकरांचा इशारा

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या पक्षप्रवेशावरुन विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महिलाविरोधी टोला लगावला

मुंबईमध्ये १६ सप्टेंबरला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या सोबत आणखी १२ कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुरेखा पुणेकर यांनी दिली आहे.

सुरेखा पुणेकरांची ओळख हि अजूनपर्यंत लावणी सम्राज्ञी म्हणून आहे. महाराष्ट्रासह परदेशातही त्यांनी लावणीबद्दल मत बदलून एक आदराचं स्थान मिळवून दिलं आहे. वयाच्या आठव्या वर्षी पायाला घुंगरू बांधून लावणीची सुपारी घ्यायला सुरुवात केली. त्यांचा नटरंगी नार हा कार्यक्रम राज्यभरात सगळीकडे प्रचंड गाजला. त्याचप्रमाणे या रावजी, बसा भावजी,  पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा,  कारभारी दमानं या त्यांच्या लावण्या खूप प्रसिद्धी मिळालेल्या आहेत.

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या पक्षप्रवेशावरुन विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महिलाविरोधी टोला लगावला असून अशी टिपण्णी केली कि, राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे. प्रवीण दरेकरांच्या या टीकेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही सडेतोड उत्तर दिलं आहे कि, प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं महिलांबद्दल वक्तव्य केलं आहेत,  त्याबद्दल तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकतं, असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे. आपल्या पक्षातील काही महिला बाहेर फिरताना आपण महिलांच्याबाबत कैवार धरून आहेत, असे दाखवण्याचा प्रयत्न करतात,  आज मला त्यांची कीव येते. आपल्या बोलण्यातून आपले वैचारिक दारिद्र्य क्षमता दिसून येते आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे ती समोर आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular