27.1 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeChiplunचिपळुणातील फायरिंगचे गूढ कायम दिवसाढवळ्या शिकार करणारा कोण?

चिपळुणातील फायरिंगचे गूढ कायम दिवसाढवळ्या शिकार करणारा कोण?

ती जिवंत कडतुस नसून शिकारीसाठी वापरात येणारा छरा होता.

शहरातील गोवळकोट रोड येथे झालेल्या फायरिंगचे गूढ कायम असून दिवसाढवळ्या शिकार करणारा कोण ? आणि कशाची शिकार करण्यासाठी आले होते? याचा थांगपत्ता लागत नसल्याने संशयातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जरी तो बंदुकीतील छरा असला तरी त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा लवकरात लवकर करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे. गोवळकोट रोड परिसरातील हायलाईफ या बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावरील अश्रफ तांबे यांच्या सदनिकेच्या स्वयंपाकघराच्या खिडकीची काच फोडून बंदुकीची गोळी स्वयंपाकघरात पडली. रविवारी सकाळी घडलेल्या या घटनेने सहाजिकच खळबळ उडाली. सुदैवाने त्यावेळी स्वयंपाकघरात कोणीही नव्हते. तसेच ती जिवंत कडतुस नसून शिकारीसाठी वापरात येणारा छरा होता हे स्पष्ट झाल्यानंतर फायरिंगचे गांभीर्य काही प्रमाणात कमी झाले. परंतु त्यावेळी एखादे लहान मूल किंवा महिला त्या स्वयंपाकघरात असती आणि तो छरा जर घुसला असता तर? त्यामुळे हे प्रकरण तितकेच गंभीर बनले आहे.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि तो छरा देखील जप्त केला. परंतु पुढे काय झाले त्याबाबत अद्यापतरी कोणतीच माहिती पुढे आलेली नाही. दिवसाउजेडी भरवस्तीत आणि सपाट शेतात कोण कसली शिकार करण्यास आले होते? सकाळीच त्यांना कोणती शिकार दिसली जेणे करून त्यांनी थेट फायरिंग केली.? ज्या ठिकाणी आपण निशाणा धरला आहे तिथे घर आहे. त्या घरात कुटुंब आहे, इतके साधे भान फायरिंग करणाऱ्याला नव्हते का? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात उत्पन्न झाले आहेत. पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला आहे. परंतु १८ तास उलटून गेले तरी अजूनही गूढ उकलेले नाही. ज्या शेतातून फायरिंग झाली ती शेती कोणाची ? आणि त्यावेळी त्याठिकाणी कोण शिकारीला आले होते ? या दोन प्रश्नांची उत्तरे मिळाली तर पुढील सर्व वस्तुस्थिती समोर येणार आहे. जरी चुकून फायरिंग झाली असेल तरीदेखील त्याची सत्यता समोर येणे आवश्यक आहे. जेणेकरून तांबे कुटुंबियांची भीती दूर होईल आणि संशय निर्माण करणाऱ्या प्रश्नांना पूर्णविराम मिळेल. त्यामुळे पोलिसांची भूमिका आता महत्वाची ठरली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular