27.3 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...

आंजर्ले किनाऱ्यावर प्लास्टिकसह काळपट द्रव…

दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाकरिता परंपरेप्रमाणे ग्रामस्थ आंजर्ले...

‘एमआयडीसी हद्दपार’चे झळकले फलक, वाटदवासीयांचे गणरायाला साकडे

एमआयडीसी हद्दपार करा, असे फलक वाटद पंचक्रोशीतील...
HomeRatnagiri'गोगटे' बाहेरील रस्त्याची दुर्दशा - अभाविप आक्रमक

‘गोगटे’ बाहेरील रस्त्याची दुर्दशा – अभाविप आक्रमक

रस्ता चिखलाने व्यापलेला असल्याने विद्यार्थ्यांना चालायला सुद्धा जागा उरलेली नाही.

गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या समोरील अरूअप्पा जोशी मार्गावरील रस्त्यावर खड्ड्यांचे राज्य उभे राहिले आहे. गेली काही वर्षे हा रस्ता दरवषीं असाच खड्डेमय असतो; परंतु प्रशासनाचे मात्र या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. या विरोधात अभाविपने आंदोलनाचा इशारा दिला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे कॉलेजमध्ये येणारे विद्यार्थी त्रस्त होत आहेत. खड्ड्यातील चिखलाचे पाणी विद्यार्थ्यांच्या कपड्यावर उडते आणि वर्गामध्ये बसावे लागते. रस्ता चिखलाने व्यापलेला असल्याने विद्यार्थ्यांना चालायलासुद्धा जागा उरलेली नाही.

चिखलाने माखलेल्या या रस्त्यावरून जाताना अपघाताचेही धोके निर्माण झाले आहेत. हा रस्ता रत्नागिरी नगरपालिका हद्दीत असून, पालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) दक्षिण रत्नागिरीच्यावतीने उपमुख्याधिकारी यांना रस्त्याच्या दुरवस्थेबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी सात दिवसांत रस्त्याच्या डागडुजीबद्दल निर्णय नाही घेण्यात आला, तर अभाविपकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याकडे पालिका प्रशासन किती गांभीर्याने पाहते हे बघावे लागणार आहे.

तातडीने रस्त्याचे काम करा – गोगटेजोगळेकर महाविद्यालयाच्या समोरील अरुअप्पा जोशी मार्गावर खड्डेच खडे झाले आहेत. गेले काही वर्षे या रस्त्याकडे वारंवार तक्रारी करूनही कोणी लक्षच दिलेले नाही. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहे. याकडे पालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन हा रस्ता तातडीने करावा, अशी मागणी स्थानिकांतून होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular