25.1 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeSindhudurgअजस्र लाटांचा तडाखा; मालवणच्या समुद्रात मच्छिमारी नौका उलटली

अजस्र लाटांचा तडाखा; मालवणच्या समुद्रात मच्छिमारी नौका उलटली

बेपत्ता जितेश याचा स्थानिक मच्छिमारांकडून समुद्रात शोध सुरू होता.

मालवण शहरातील मेढा येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली संगम नावाची छोटी मच्छिमारी नौका ही सोसाट्याचा वारा आणि लाटांच्या माऱ्यांमुळे पलटी झाल्याने होडीतील तीनही मच्छीमार पाण्यात फेकले गेल्याने जितेश विजय वाघ (वय ३५) हा मच्छिमार समुद्रात बेपत्ता झाला आहे तर कीर्तीदा लीलाधर तारी (वय २९), सचिन सुभाष केळुसकर (वय ४२) हे सुदैवाने बचावले असून या दोन्ही मच्छिमारानी सुखरूप किनारा गाठला आहे ही घटना मंगळवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. बेपत्ता जितेश याचा स्थानिक मच्छिमारांकडून समुद्रात शोध सुरू होता. याबाबतचे अधिक वृत्त असे कि, मालवण शहरातील मेढा जोशी वाडा येथील कीर्तीदा लीलाधर तारी (वय २९), सचिन सुभाष केळुसकर (वय-४२), जितेश विजय वाघ (वय ३५) हे तीन मच्छीमार मेढा राजकोट येथील समुद्रात सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान संगम नावाच्या छोट्या नौकेतून मासेमारी करण्यासाठी गेले होते. बुडी पद्धतीच्या मासेमारीत काल समुद्रात टाकून ठेवलेली जाळी आज सकाळी काढण्यासाठी हे तिघेही गेले होते.

मात्र, मेढा राजकोट समोरील समुद्रातील नस्ताच्या ठिकाणी जोराचा वारा व मोठ्या लाटांचा तडाखा या नौकेला बसून नौका पलटी झाली. यात तीनही मच्छीमार समुद्रात फेकले गेले. यामध्ये जितेश हा नौकेपासून दूर वाहून जात समुद्रात बेपत्ता झाला. तर कीर्तीदा तारी व सचिन केळुसकर हे सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले. या दुर्घटनेबद्दल कळताच मेढा येथील स्थानिक मच्छिमारांनी किनाऱ्यावर धाव घेतली. दुर्घटनाग्रस्त नौका स्थानिक मच्छीमारांनी किनाऱ्यावर आणून ठेवली.या घटनेची माहिती मिळताच मालवण पोलीसांनीही तातडीने किनाऱ्यावर धाव घेतली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक मारुती जगताप, महादेव घागरे यांनी भेट देत मच्छिमारांकडून माहिती घेतली.

RELATED ARTICLES

Most Popular