29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

चिपळूण घरकुलाचे स्वप्न जमीनदोस्त, तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या...

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कन्या एक्स्प्रेसमध्ये तरुणीचा धिंगाणा, प्रवासी हैराण

कोकण रेल्वेमधील एसी डब्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या...

दुर्गम भागासाठी हवी स्वतंत्र संचमान्यता – मुख्याध्यापक संघाची मागणी

शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या संचमान्यता निर्णयामुळे...
HomeRatnagiriमिऱ्या-कोल्हापूर-नागपूर महामार्गाचे काम वेगात, आंबा घाटात भुयारी मार्गाचे सर्व्हेक्षण

मिऱ्या-कोल्हापूर-नागपूर महामार्गाचे काम वेगात, आंबा घाटात भुयारी मार्गाचे सर्व्हेक्षण

हा घाट पूर्णतः एका रेषेत नसल्याने ३ बोगदे खोदावे लागणार आहेत.

मिऱ्या-कोल्हापूर-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने सुरू असून मिऱ्या ते आंबा या ५७ किमी लांबीच्या कामाला गती मिळाली आहे. आता याच मार्गावरती आंबा घाटात भुयारी मार्ग काढण्याबाबत सर्व्हे सुरू असल्याचे समजते. रत्नागिरी शहरालगतचे रेल्वेस्टेशन ते आंबेडकर भवन या दरम्यान ७५० मीटरचा उड्डाणपूल बांधण्याबाबतचा डी.पी.आर तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मिऱ्या ते आंबा हा ५७किलोमीटर मार्गाच्या चौपदरीकरणाला ९३० कोटी रूपये खर्च येणार असून त्यापैकी आतापर्यंत ७८ टक्के काम झाले असून उर्वरीत काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या मध्ये ४१ किमी क्राँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आता यामधील महत्वाचे आंबा घाटात दुपदरीकरण सध्या सुरू आहे. त्यापैकी एका बाजूने काम सुरू झाले आहे.

३ भुयारी बोगदे – पण आता आंबा घाटात ३ बोगदे भुयारी मार्गाचा विचार सुरू असून त्याचा सर्व्हे करण्याचे काम सुरू आहे. हा घाट पूर्णतः एका रेषेत नसल्याने ३ बोगदे खोदावे लागणार आहेत. ६ किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. साधारणतः या करिता २४०० कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे तरं याच मिऱ्या ते आंबा या मार्गावरती रेल्वेस्थानक ते आंबेडकर भवन या दोन्ही ठिकाणांना जोडणारा उड्डाणपूल उभारण्यात येणार असून त्याचा डी.पी.आर तयार करण्यात येत आहे. त्याला सुमारे १०० कोटी खर्च अपेक्षित आहे. ७५० मीटर लांबीचा हा उड्डाणपूल पिलरवरती १४ ते १५ असतील त्यावरती ही उभा राहणार आहे. आरटीओ कार्यालयापर्यंत तो असेल. यामध्ये महत्वाच्या अशा मिऱ्या ते आंबा या कामामध्ये या आंबा घाटातील बोगदा आणि रेल्वेस्थानक ते आंबेडकर भवन उड्डाणपूल या कामांचा समावेश नाही. त्याच्या दोन निविदा वेगवेगळ्या काढण्यात येतील असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular