31.5 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

दांडगा वशीला असलेला कोकरे महाराज पोलीस कोठडीत !

या भगवान कोकरे नावाच्या महाराजाचा लोटे व...

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...
HomeRatnagiriएसटी थेट गावी, रत्नागिरी एसटी महामंडळाचा स्तुत्य उपक्रम

एसटी थेट गावी, रत्नागिरी एसटी महामंडळाचा स्तुत्य उपक्रम

एसटी महामंडळाकडून गणेशोत्सवासाठी दरवर्षी उत्तम नियोजन केले जाते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी महामंडळाच्या एसटी थेट गावी उपक्रम अंमलबजावणीसाठी सर्व आगारव्यवस्थापकांची बैठक घेतलेली.

गणेशोत्सवामध्ये कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची प्रवासाची हेळसांड होऊ नये यासाठी रत्नागिरी एसटी विभागाने जादा गाड्या सोडल्या होत्या. त्याचप्रमाणे परतीसाठी सुद्धा थेट चाकमान्यांच्या गावी एसटी नेण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आतापर्यंत २६७ चाकरमान्यांनी ग्रुप बुकिंग केले असून २६७ गावामध्ये आता थेट एसटी जाणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली. एसटी महामंडळाकडून गणेशोत्सवासाठी दरवर्षी उत्तम नियोजन केले जाते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी महामंडळाच्या एसटी थेट गावी उपक्रम अंमलबजावणीसाठी सर्व आगारव्यवस्थापकांची बैठक घेतलेली.

१४ सप्टेंबरपासून म्हणजेच गौरी गणपती विसर्जनापासून आता या उपक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. रत्नागिरी एसटी विभागाने परतीसाठी आत्ता पर्यंत २६७ ग्रुप बुकिंग झाले असून आठवडाभरामध्ये या संख्येत आणखी वाढ होईल,  असा विश्वास व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे गावातील लोकांना बससाठी तालुक्याच्या ठिकाणी यायला त्रास पडू नये, यासाठी एसटी थेट गावी उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

एसटी गणेशोत्सवासाठी दरवर्षी उत्तम नियोजन करतेच. गणपतीच्या या कालावधीमध्ये एसटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जात नाही. जेणेकरून अधिकाधिक गाड्या महामंडळाकडून सोडता याव्यात यासाठी हे नियोजन महिनाभर आधीपासूनच केले जाते. त्यामुळे जर अगदीच सुट्टीची गरज असेल तरच अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सुट्ट्या मान्य केल्या जातात. कोरोनामुळे वर्षभर एसटी महामंडळाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून, अशा प्रकारे विविध उपक्रम राबवून अधिकारी आणि कर्मचार्यांच्या सहकार्याने महामंडळ आर्थिक रित्या सक्षम होण्याकडे जास्त लक्ष देत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular